
South Mumbai News
February 17, 2025 at 10:29 AM
जे.जे. रुग्णालयात शस्त्रक्रिया आता होणार अधिक जलद
सीएसआर निधीतून अद्ययावत उपकरणे
जे. जे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या विविध शस्त्रक्रिया आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहेत. यासाठी आवश्यक उच्च तंत्रज्ञान असलेली उपकरणे मफतलाल ट्रस्टने सीएसआर निधीतून उपलब्ध करून दिली आहेत. ट्रस्टने कान, नाक घसा आणि न्यूरोसर्जरी ऑपेरेशन विएटरसाठी अत्याधुनिक अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन, हाय स्पीड न्यूरोसर्जिकल डिल आणि प्रकाश योजनेची मदत केली आहे. यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये अधिक अचूकता आणि कार्यक्षमता येईल, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
नवीन वर्कस्टेशनमुळे शस्त्रक्रिया करतेवेळी अचूक आणि सुरक्षित भूल देण्यास मदत होईल, हाय स्पीड न्यूरोसर्जिकल ड्रिल है न्यूरोसर्जरीमधील एक आधुनिक साधन आहे, यात रुग्णांना होणारा आघात कमी करण्यासोबत अचूक शस्त्रक्रिया शक्य होणार आहे