South Mumbai News
February 27, 2025 at 01:05 PM
कुलाबा येथील फर्स्ट पास्ता लेन आणि विंडी हॉल लेन या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे गैरसोय होत असल्याने है रस्ते पूर्ण करावेत, असा अल्टिमेटम रहिवाशांनी पालिकेला दिला आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.
शहर भागातील रस्त्यांची कामे निविदा प्रक्रियेतील घोळामुळे सुरू होऊ शकली नव्हती. ऑक्टोबर २०२४ पासून ही कामे अद्याप सुरू आहेत. त्यात कुलाबा येथील फर्स्ट पास्ता लेन विंडी हॉल लेनसह अन्य रस्त्यांचा समावेश आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून अर्धवट अवस्थेतील कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाला २७ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. आणि काँक्रिटीकरणासाठी रस्ते खोदून ठेवल्यामुळे चालणे मुश्किल झाले आहे. रस्ते तातडीने पूर्ववत न केल्यास नागरिकांसह त्याच रस्त्यांवर उतरून आंदोलन करू, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे. पालिकेचे अभियंते आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे