South Mumbai News
March 1, 2025 at 10:12 AM
मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या आरे ते कफ परेड या मेट्रो मार्गावरील शेवटच्या स्थानकापर्यंत अखेर पहिली गाडी धावली आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या मार्गावर शुक्रवारी गाडी चालवून एमएमआरसीने आणखी एक टप्पा पार केला आहे. त्यामुळे या मेट्रोचा कफ परेडपर्यंतचा सपूर्ण मार्ग जुलैअखेरपर्यंत सुरू करणे सक्य होणार असून, त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉपरिशनने (एमएमआरसी) तयारी पूर्ण केली आहे.
मेट्रो ३ मार्गिका ३३.५ किमी लांबीची असून, तिथा आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे, तर सद्यःस्थितीत एमएमआरसीकडून बीकेसी ते वरळी नाका येथील आचार्य अत्रे स्थानकापर्यंतच्या टप्पा २ अ या मार्गावर मेट्रो गाडीच्या चाचण्या सुरू