
Chinchpoklicha Chintamani Official | चिंचपोकळीचा चिंतामणी अधिकृत
May 25, 2025 at 11:51 AM
*चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ*
*विकासाच्या नावाखाली होणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे वसुंधरा धोक्यात आली आहे. वर्षाला वाढणारे पाण्याचे दुर्मिक्ष, तुटणारी अन्नसाखळी वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावणे काळाची गरज बनली आहे.*
*चिं.सा.उ.मंडळाच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आलेल्या चिंतामणी चषक क्रिकेट स्पर्धेत जेवढे डॉट बॉल होतील त्या डॉट बॉल च्या दहाच्या पटीत सीड बॉल बनवण्याचा संकल्प केला होता त्यानुसार एकूण 7550 सीड बॉल बनविण्यात आले.*
*सीडबॉल च्या माध्यमातून पर्यावरण वाढवण्यासाठी प्रश्न फॉउंडेशन (नवी मुंबई ) यांच्या सहकार्याने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने एक पाऊल पुढे टाकत सीड बॉल बनवून डोंगराळ भागात जाऊन तिथे टाकून वनराई नैसर्गिकरित्या वाढविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.*
*विठ्ठलदास पै*
*अध्यक्ष*
*वासुदेव सावंत* *विकास सावंत*
*मानद सचिव* *कोषाध्यक्ष*

❤️
👍
🙏
😮
65