
ANN Akola News Network
May 13, 2025 at 05:41 AM
*रसिक प्रेक्षकांनो हा सन्मान आमचा नाही, तुमचाच आहे…!*
आज *‘अकोला न्यूज नेटवर्क’* च्या *YouTube चॅनलने 1 लाख सबस्क्राईबरचा टप्पा पार केला आहे…* आणि या यशाचं खरं *श्रेय तुमच्यासारख्या विश्वासू, जागरूक आणि प्रेमळ प्रेक्षकांना* जातं.
*_तुमच्या विश्वासामुळे आम्ही वाढलो, तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही टिकून राहिलो, आणि तुमच्या प्रेमामुळेच आज १ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलो._*
तुम्ही दाखवलेला प्रेम, आदर, आणि प्रामाणिक प्रतिक्रिया यामुळेच आम्ही दर दिवशी स्वतःला अधिक जबाबदार समजतो. बातमी ही केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून, ती *तुमच्या भावना, तुमचा आवाज* बनावी, हीच आमची भूमिका आहे… आणि यापुढेही ती अधिक प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत.
*_हे 'Silver Play Button' आमच्यासाठी नाही, तर त्या आजीचा आहे जी आमचं थेट प्रक्षेपण पाहते, त्या तरुणाचा, त्या ताईचा आहे जो बातम्या शेअर करतो, आणि त्या नागरिकाचा आहे जो योग्य बातमीसाठी आमच्यावर विश्वास ठेवतो._*
*आमच्या बातम्यांमधून आणखी जबाबदारी, आणखी प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांच्या हक्काचा आवाज* देण्याचा आमचा निर्धार आहे.
_या प्रवासात सोबत दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार, आणि भविष्याच्या वाटचालीसाठीही तितकंच प्रेम लाभो, हीच अपेक्षा!_
आपल्यात वाद नकोत म्हणून *धन्य+वाद = ~धन्यवाद~ म्हणणार नाही,* पण तुम्हा सर्वांची संपूर्ण *अकोला न्यूज नेटवर्क ची टीम आभार मानण्यास आधीच विसरणार नाही.*
*सदैव आपल्या सेवेत तत्पर*
*– टीम ANN | Akola News Network*
*हा सन्मान ‘तुम्हा सर्वांना’ अर्पण!*
*_हाक तुमची | साथ आमची_*
*https://www.youtube.com/@annakolanewsnetwork?sub_confirmation=1*