MahaBharti Exam
June 11, 2025 at 02:10 AM
🔷 चालू घडामोडी :- 10 जून 2025 ◆ UAE देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मुहम्मद वसीम ची ICC प्लेयर ऑफ मंथ मे 2025 साठी निवड करण्यात आली आहे. ◆ हिमाचल प्रदेश राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे. ◆ 16व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य पदी टी रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ वित्त आयोगाची तरतूद राज्य घटनेच्या 280 कलमात आहे. ◆ पद्दुचेरी विधानसभेने नॅशनल ई विधान एप्लीकेशन सुरू केले आहे. ◆ फर्टीलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी शैलेश सी मेहता ची निवड झाली आहे. ◆ ऑस्ट्रेलिया देशाचा माजी क्रिकेट खेळाडू मॅथ्यू हेडन याचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे. ◆ महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नस पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे. ◆ 28वी नॅशनल इ गव्हर्नन्स परिषद 2025 विशाखापट्टणम मध्ये आयोजित करण्यात आली आहे. ◆ दक्षिण आफ्रिका देशाचा माजी क्रिकेट खेळाडू हाशिम आमला याचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे. ◆ तामिळनाडू राज्यात 800 वर्षे जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे. ◆ एम एस धोनी ICC हॉल मध्ये फेम मध्ये समावेश होणारा आकरावा भारतीय खेळाडू ठरला आहे. ◆ प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना 2024 चा तामिळनाडू राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ◆ वर्ल्ड एक्स्पो 2025 जपान मध्ये आयोजित करण्यात आला आहे. ◆ भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला 41 वर्षानंतर अंतराळात जाणार आहे.
👌 1

Comments