
Makarand Narwekar
June 1, 2025 at 06:16 AM
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्नती मंडळाच्यावतीने चर्चगेट स्टेशन समोरील अहिल्यादेवी होळकर चौकात एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवींना नमन केले. यावेळी उपस्थित सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अहिल्यादेवींनी देशभरातील विविध तीर्थक्षेत्रांतील मंदिरे पुनर्निर्मिती करून धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला. त्यांनी दिलेल्या उत्तम प्रशासनाच्या आदर्शातून संपूर्ण समाजाला नवी दिशा दिली. स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मूलमंत्र त्या काळातच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवला जेव्हा स्त्रियांना कोणतेही सामाजिक अधिकार मिळालेले नव्हते.
अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून भविष्यातील पिढ्यांसाठीही एक उज्वल मार्गदर्शन ठरेल.
#powertopeople #ahilyadevijayanti
❤️
❤
3