.... بدلاؤ ضروری ہے ....
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 7, 2025 at 01:55 PM
*बदली पोर्टल बाबत..* बदली पोर्टल वर संवर्ग -१, २ संबंधाने प्राथमिक कार्यवाही सुरू झाली असून वेळापत्रक जाहीर झाले. परंतु संवर्ग -१ साठी होकार किंवा नकार आणि संवर्ग - २ बदली साठी संधी यासाठीचा अर्ज अद्याप ओपन होत नाही.‌ ‌‌ *नुकतीच याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.* संबंधित जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रियेशी संबंधित समन्वयक वा अन्य आस्थापनाविषयक कर्मचारी पुढील सूचना निर्गत करतील.‌ अथवा आपण काही वेळाने पोर्टल ओपन करून पाहिल्यावर स्थिती लक्षात येईल. *सर्वांना पुरेशी संधी मिळणार आहे.* *त्यामुळे लगेच अस्वस्थ होऊन आमचा फार्म ओपन होत नाही. आम्हाला होकार किंवा नकार भरायचा आहे. अर्ज भरायचा आहे. अशा पद्धतीने व्यक्तिश: वारंवार फोन करून व मेसेज लिहून घाई करण्याऐवजी शांततेने व संयम ठेवून वाट पहावी ही विनंती. कोणत्याही घाईघाईने पोस्ट टाकणाऱ्यांच्या घाई व आतताई स्वभावानुसार वाटचाल न करता अधिकृत व खात्रीशीर पोस्टकडे लक्ष असू द्यावे. त्याप्रमाणे आपण पोर्टल उघडून स्वतः खात्री करावी.* *💫AMUSS TEAM JALNA✨*

Comments