
शब्दांकुर | SHABDANKOOR -Thought Leader Insights
May 20, 2025 at 01:40 PM
थोडा जुन्या विचारांचा आहे. या झगमगाटाच्या दुनियेत जिथे प्रत्येकजण स्वतःला मोठं दाखवण्याच्या नादात आहे, तिथे मात्र शांतपणे काम करत राहणं पसंत करतो. माझ्यासाठी माणसाच्या मोठेपणाचं मोजमाप त्याच्या बोलण्यात नाही, तर त्याच्या वागण्यात असतं. मी कधीही स्वतःचं गुणगान गात नाही, कारण मला ठाऊक आहे. जे खरं असतं, ते स्वतःहून उठून दिसतं.
माझा विश्वास कृतीवर आहे, कारण शब्द चकाकतात पण कृती विश्वास निर्माण करतात. जगाला दाखवण्यासाठी जगणं मला रुचत नाही; मी जगतो माझ्या मूल्यांसाठी, माझ्या कर्मासाठी. लोक काय म्हणतील यापेक्षा मला ते महत्त्वाचं वाटतं की मी माझ्या अंतरात्म्याला काय उत्तर देतो. म्हणूनच, मी दाखवत नाही… निभावतो.
https://x.com/shabdankoor/status/1924819642452746566?s=19
Follow the *शब्दांकुर | SHABDANKOOR* channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5AQNY8qIzpxNrJtj1N
Like ❤️
Share 👍