
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
June 8, 2025 at 06:06 AM
*_आयसीआयसीआय बँकेत ४.५८ कोटींचा घोटाळा: रिलेशनशिप मॅनेजरनेच ग्राहकांना फसवलं..._* 🏦💸
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या कोटा शाखेतील रिलेशनशिप मॅनेजर साक्षी गुप्ता हिने चक्क ४.५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे! 🤯
साक्षीने गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून (२०२० ते २०२३ दरम्यान) ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून परस्पर पैसे काढले. तिने ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलले, मुदत ठेवी मोडल्या, कर्ज घेतले आणि शेअर बाजारात पैसे लावले. 📉
एका ग्राहकाने आपल्या एफडीची चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर बँकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. साक्षीला अटक करण्यात आली असून ती न्यायालयीन कोठडीत आहे. बँकेने त्वरित कारवाई करत तिला निलंबित केले आहे. 🚨
या घटनेमुळे ग्राहकांनी आपल्या बँक खात्यांवर नियमित लक्ष ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. Vigilant रहा! 🧐