Jk Infotainment-Nashik Digital Magazine
Jk Infotainment-Nashik Digital Magazine
June 8, 2025 at 11:19 AM
🚨 *_नाशिकमध्ये बुलेट चोरी करणाऱ्याला बेड्या..._* 🏍️ नाशिक शहर पोलिसांनी बुलेट चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपीने अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. 🚔 पोलिसांनी इंदिरानगर परिसरातून चोरी झालेल्या एका बुलेटच्या तपासातून या आरोपीचा माग काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने नाशिकमध्ये एकूण सहा बुलेट चोरल्याचे कबूल केले. चोरीच्या बुलेट विकत घेणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या बुलेट हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरांना चाप बसला आहे. 💁‍♀️ *_Stay connected! Join our WhatsApp channel now_*

Comments