SPPU Exam Update - Mr Akshay Bale
June 10, 2025 at 08:29 AM
11th Admission : प्रवेश प्रक्रिया पुन्हा बदलली; 26 जूनला होणार गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात २७ जून ते ३ जुलै या कालावधीत अकरावीसाठी प्रवेश करण्यात येणार आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील (11th admission) कारभार पूर्णपणे नियोजनशून्य आणि गोंधळाचा ठरताना दिसून येत आहे. वेळापत्रकातील सततच्या बदलामुळे (timetable change), विद्यार्थी व पालकांना (students and parants) भलताच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात 10 जूनला पहिली गुणवत्ता यादी (कॅप राउंड) प्रसिद्ध होणार होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार तब्बल 16 दिवसांनी म्हणजेच 26 जूनला ही यादी प्रसिद्ध होणार आहे.
राज्यात २७ जून ते ३ जुलै या कालावधीत अकरावीसाठी प्रवेश करण्यात येणार आहे. तर त्याआधी २६ जून रोजी कॅप फेरीतील प्रवेश होतील. त्याचबरोबर ५ जुलै रोजी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. ११ जून रोजी सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तथापि, राज्यात ७ जून ते ९ जून या कालावधीत तात्पुरत्या गुणवत्ता यादीमधील तक्रारी आणि हरकतीसाठी मुभा होती.
दरम्यान, शालेय शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार आणि वेळेचे भान न ठेवता घेतल्या जाणार्या निर्णयामुळे प्रवेशाची पारदर्शकताच धोक्यात आली आहे असे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत वेळापत्रकांतील सतत बदलांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक
अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप – ११ जून
शून्य फेरीतील प्रवेश प्रक्रिया – १२ ते १४ जून
नियमित फेरी १ चे वाटप – १७ जून
नियमित फेरी प्रवेश जाहीर करणे – २६ जून
प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेणे – २७ ते ३ जुलै
नियमित फेरी २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे – ५ जुलै