🚨 गणित मंच 🚨
June 13, 2025 at 12:17 PM
नोट्स का, कधी आणि कश्या काढाव्या?
नोट्स का काढायच्या?
एकाद्या टॉपिक वरील पुस्तकातील, इंटरनेट, टेस्ट सीरीज इ वरील सर्व महत्त्वाच्या गोष्टी एका ठिकाणी कलेक्ट होतात, मिल्टिपल आणि फ़ास्ट रिव्हिजन होते, व्हिजुअल मेमरी तयार होते. एक्साम च्या दिवसात मोठ्या पुस्तकातून रिव्हिजन करायचा ताण येत नाही.
कधी काढायच्या?
फर्स्ट रीडिंग नंतर लगेच नोट्स काढू नका. तुमची दुसरी रीडिंग झाली की मग नोट्स काढायला घ्या कारण तोपर्यंत आपल्याला त्या टॉपिक मधे काय महत्वाचे आहे आणि आपल्या काय लक्षात रहात नाही हे समजते. तसेच आपण त्या टॉपिक वरील इतर पुस्तकातून किंवा इंटरनेट वरून value addition पण करू शकतो.
नोट्स कश्या काढाव्या?
कधीही नोट्स मधे कोरून अक्षर काढणे, मोठी मोठी वाक्ये लिहिणे आणि नोट्स च्या नादात पूर्ण पुस्तकच उतरवणे टाळा. 😃 आपला नोट्स काढायचा उद्देश आहे की स्वतःला जास्तीत जास्त रिव्हिजन करता याव्यात व परीक्षेच्या वेळी लास्ट मिनिट रिव्हिजन पण व्हायला हवी. नोट्स स्वतःसाठी काढायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला समजतील अश्या काढा आणि कमीत कमी वेळात काढा. तसेच सर्व विषयांच्या नोट्स काढायची गरज नाही. तुम्हाला विषय सोपा वाटतोय, पुस्तकातून रिव्हिजन फास्ट होतेय जसे की भूगोल किंवा पोलिटी तर नोट्स ची गरज नाही. पण जे विषय अवघड वाटतात eg. इकॉनॉमिक्स किंवा खूप जास्त डेटा आहे eg. लोकसंख्या टॉपिक, पंचायत राज तर तिथे नोट्स काढा. काही वेळेला तर एखाद्या विषयाचं पुस्तक खूप परिपूर्ण असते किंवा जवळपास नोट्स सारखेच असते अश्या वेळी वेगळ्या नोट्स न काढता त्या पुस्तकातच हायलाईटर ने अति महत्त्वाच्या गोष्टी हाईलाइट करा आणि value addition पुस्तकातील मार्जिन मधे लिहा.
Wish you Effective Notes making 😊
All the best.🎉💐
DYSP Pramod Chougule sir🙏🙏
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
❤️
👍
❤
🙏
12