
Shivsena
June 11, 2025 at 06:38 AM
हिंद के बेटे!
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींनी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर आज कौतुकाची थाप दिली तो हा क्षण.
'ऑपरेशन सिंदूर'चे यश आणि पाक पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा उघड करण्यासाठी जगभर गेलेल्या खासदारांची विशेष बैठक आज नवी दिल्ली येथे पंतप्रधानांचे निवासस्थान ७, लोककल्याण मार्ग इथे पार पडली. यातील खासदारांच्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते. त्यांच्या वकृत्व आणि शिष्टाईच्या कौशल्यामुळे त्यांचा दौरा विशेष गाजला. याची दखल आज स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी घेतली. हाच क्षण नेमका कॅमेऱ्यात बंदिस्त झाला. देशासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या विशेष मोहिमेत नेतृत्व करण्याची आणि सहभागी होण्याची संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिल्याबद्दल शिवसेनेतर्फे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींचे मन:पूर्वक आभार. तसेच हा शिष्टाई दौरा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शिवसेनेतर्फे मनापासून अभिनंदन!
#shivsena #narendramodi #eknathshinde #drshrikanteknathshinde

❤️
👎
🙏
🚩
4