
Shivsena
June 11, 2025 at 06:54 AM
भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथील ७, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्री. मिलिंद देवरा यांना भेट घेण्याचा सन्मान मिळाला. यूएई, काँगो लोकशाही प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्राप्त झाली होती. तर खासदार मिलिंद देवरा हे खासदार श्री. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी झाले होते. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांनी भारताची दहशतवादाविरोधातील ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली होती. याबाबत सर्वपक्षीय खासदारांच्या दौऱ्याचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान महोदयांनी सर्व खासदारांच्या प्रयत्नांचे मन:पूर्वक कौतुक केले. यात शिवसेनेच्या खासदारांचा सहभाग होत असल्याने शिवसेनेसाठी ही अभिमानाची बाब आहे. या मोहिमेत शिवसेनेच्या खासदारांंना संधी दिल्याबद्दल पंतप्रधान महोदयांचे शिवसेनेतर्फे मन:पूर्वक आभार!
Shiv Sena MP Dr. Shrikant Shinde and MP Shri. Milind Deora had the honour of meeting Honourable Prime Minister of India, Shri. Narendra Modiji, today at his residence at 7, Lok Kalyan Marg, New Delhi.
Dr. Shrikant Shinde had the opportunity to lead an all-party delegation that visited the UAE, the Democratic Republic of Congo, Sierra Leone, and Liberia. MP Milind Deora was part of a delegation led by MP Shri Shashi Tharoor.
During this visit, both leaders firmly and clearly presented India’s strong stance against terrorism. A special meeting was held today at the Prime Minister’s residence to review the outcomes of the all-party delegation’s visit. On this occasion, the Prime Minister wholeheartedly appreciated the efforts of all the participating MPs.
With Shiv Sena MPs being part of this mission, it is a matter of pride for the party. The Shiv Sena sincerely thanks the Honourable Prime Minister for giving their MPs the opportunity to be part of this important mission.
#indiaagainstterrorism #shivsena #narendramodi #drshrikanteknathshinde #allpartydelegation
🙏
1