
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 13, 2025 at 11:34 PM
*श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:
*२०३. अभंग ऐतरेयभावार्थरूप*
आत्मा हो निमित्त माया उपादान ।
म्हणती ही ये न द्वैतवाद ।।१।।
माया अवास्तवी शक्ति आत्म्याची हे ।
आत्मदृष्टीनें हे रची विश्व ।।२।।
कूटस्थरूपा जी न येतां विकार ।
रची चराचर मायावीसी ।।३।।
अनिर्वाच्य माया घेतां ही श्रुतीस ।
अखंडैकरस बोलूं आला ।।४।।
सामानाधिकरण्य आत्मजगताचें ।
बोधार्थ सांभाचे जेविं चोर ।।५।।
🙏
❤️
🙇♀
8