
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 17, 2025 at 12:37 AM
*श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:
*२०६. अभंग ऐतरेयभावार्थरूप*
जलमुख्य भूतां घेवोनी परेशा । रचूनि पुरूष तया पाहे ।।१।।
अंडवत मुख फुटोनी हो वाचा | जन्म हो अग्नीचा तीपासून ।।२।।
नासा उपजली प्राण तीपासून | वायू त्यापासून उत्पन्न हो ।।३।।
झाली अक्षिछिद्रें चक्षु त्यापासून । सूर्य त्यापासून उत्पन्न हो ।।४।।
उपजे कर्ण श्रोत्र त्यापासून । होती त्यापासून दाही दिशा ।।५।।
🙏
❤️
👌
🙇♀
11