
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 18, 2025 at 12:15 AM
*श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:
*२०७. अभंग ऐतरेयभावार्थरूप*
त्वचा उपजली तीपासून रोम | त्यापासोनि जन्म ओषधींचा ।।१।।
हृदय उपजलें त्यापासोनि मन । चंद्रा ये जनन त्यापासून ।।२।।
नाभी उपजली तेथें हो अपान । मृत्यु त्यापासून उत्पन्न हो ।।३।।
शिश्न झालें तेथ उपजलें रेत । आप उपजत त्यापासून ।।४ ।।
🙏
❤️
👌
🙇♀
12