🚩🚩🚩लढा गरजवंत मराठ्यांचा🚩🚩🚩
June 8, 2025 at 07:40 AM
याची अंमलबजावणी मराठा समाजाकडून होईल का...पैसे असणारे अश्या नियमांना मुर्खात काढतील..मध्यम वर्गीय ओढाताण करून जमीन विकून कर्ज काढून मोठ्यांची बरोबरी करायला लागतील आणि गोरगरीब समाज सामान्य पद्धतीने लग्नकार्य करतील तर पैसेवाले आणि मध्यमवर्गीय गरीब मराठ्यासोबत सोयरिक करायचे सुद्धा टाळतील..म्हणून समाज सुधारणा करण्याची जबाबदारी श्रीमंत मराठ्यांची आहे आणि त्यासाठी थोडा सुद्धा संकोच बाळगू नका..समाज सुधाण्यासाठी इतिहासात आजपर्यंत नेहमी श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांचा पुढाकार कामी आला आहे..गौतम बुद्ध राजपुत्र होते, शिवराय सरदाराचे पुत्र होते,तुकाराम महाराज सावकार होते,महात्मा गांधी वकील होते,नेताजी सुभाषचंद्र बोस मोठ्या वकिलाचे पुत्र होते, आंबेडकर स्वतः वकील आणि प्रतिष्ठित होते...म्हणूनच लोकांनी त्यांचे अनुकरण केले...
आपल्या समाजात लग्नातील तसेच अन्य धार्मिक कार्यात आणि सामाजिक देखाव्यासाठी असा अनावश्यक खर्च करणाऱ्या लोकांना त्याआधी समजावून सांगा आणि एकत नसतील तर त्यांच्या कार्यात जाऊ नका...समाज सुधारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना नावे ठेवण्यापेक्षा त्यांचे अनुकरण करा..
मी तर एवढे सुद्धा म्हणेन की मोतीबिंदू ऑपरेशन, महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रिया,प्रसूती, तापीचे आजार इत्यादी लहान सहान आजारातून बरे झाल्यास त्यांना भेटायला जाताना आहेर नेने ,त्यांनी उलट आहेर करणे यातून सुद्धा दोन्ही कुटुंबाची आर्थिक हानी होते..त्यामुळे या प्रथा बंद करायला पाहिजेत...याउलट आजारात ,दवाखाना खर्च म्हणून जमेल तशी आर्थिक मदत करावी पण कपडे लत्ते करण्यात व्यर्थ पैसा खर्च करू नये...कारण बाकी हजार कारणे असले तरी मोठेपणा मिरवण्याचा अनाठायी अट्टाहास हे देखील मराठ्यांच्या पीछेहाटीचे प्रमुख कारण आहे..
नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात श्री पाटील नावाचे एक आदर्श शिक्षक सेवा निवृत्त झाले..त्यांच्या निरोप समरंभासाठी हार तुरे यासाठी कोणताही खर्च न करता जमेल तेवढी रक्कम जमा करण्यास विनंती केली आहे.ही रक्कम मराठा विद्यार्थ्यांच्या वसती गृहासाठी दिली जाणार आहे...याच सरांच्या पत्नी काही दिवसांपूर्वी निधन पावल्या तेव्हा त्यांनी अंतिम संस्कार आणि तेरवी साठी कोणताही अधिकचा खर्च न करता तो पैसा मराठा मुलींच्या शिक्षणाला दिला होता...अश्या प्रथा सर्वजण अमलात आणतील तेव्हा समाज सुधारणेला खरी गती प्राप्त होईल..

👍
❤️
😮
18