
Adv Rohini Eknathrao Khadse (Official)
June 3, 2025 at 03:37 PM
आज महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची मुंबई राजभवन येथे भेट घेतली. यावेळी सध्या राज्यात महिलांवर होणारे अत्याचार आणि अन्यायांच्या घटनांची माहिती त्यांना दिली तसेच यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे मा. राज्यपाल महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
राज्यात महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होत असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची निष्क्रीयता दिसून येत आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर स्वतंत्र व्यक्ती नेमण्यात यावी अशी मागणी मा. राज्यपाल महोदयांकडे केली.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे मी व माजी आमदार विद्याताई चव्हाण, शिवसेनेतर्फे नेत्या सुषमाताई अंधारे, माजी महापौर किशोरताई पेडणेकर, जयश्रीताई शेळके, काँग्रेस तर्फे आमदार ज्योतीताई गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
@maha_governor @andharesushama @KishoriPednekar @Vidyaspeaks @DrJyotiEGaikwad @NCPspeaks @Maha_MahilaAyog