Reliable MPSC PSI STI ASO
Reliable MPSC PSI STI ASO
June 20, 2025 at 07:51 AM
🛰️ फतह-1 हायपरसॉनिक क्षेपणास्त्र 🔹 सद्यस्थिती इराण-इस्रायल संघर्षात इराणने 'ऑपरेशन ऑनेस्ट प्रॉमिस 3' अंतर्गत इस्रायलवर Fattah-1 या अत्याधुनिक हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. 🚀 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये 🔸 हायपरसॉनिक वेग Mach 5 पेक्षा (ध्वनीच्या गतीपेक्षा 5 पट) अधिक वेगाने हे क्षेपणास्त्र प्रवास करते. ➡️ त्यामुळे शत्रूच्या संरक्षण यंत्रणा (जसे की आयर्न डोम) अकार्यक्षम ठरू शकतात. 🔸 अत्यंत अचूक लक्ष्यभेद हायपरसॉनिक वेगामुळे लक्ष्य गाठण्यासाठी कमी वेळ लागतो व अचूकतेत मोठी वाढ होते. 🔸 मार्ग बदलण्याची क्षमता (Maneuverability) हे क्षेपणास्त्र उड्डाणादरम्यान आपला मार्ग बदलू शकते, ज्यामुळे त्याचा माग काढणे आणि नष्ट करणे कठीण ठरते. 🔸 पल्ला अधिकृत माहिती नसली तरी तज्ज्ञांच्या मते याचा पल्ला 2000 किमी पर्यंत जाऊ शकतो — इस्रायलसारख्या देशांवर सहज हल्ला करण्याची क्षमता 🔸 संरक्षण यंत्रणांना चकमा देण्याची क्षमता: इस्रायलच्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालींसारख्या 'Iron Dome' यांना चकवू शकतो, असा इराणचा दावा आहे. 📌 ‘फतह’ या अरबी शब्दाचा अर्थ विजय किंवा जिंकणारा असा होतो. #defence #world

Comments