
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 15, 2025 at 06:43 PM
*🪄••••••शैक्षणिक बातम्या••••••🪄*
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*संकलन-सतीश कोळी शिक्षक समिती,*_
_महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP_
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*🎒पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत*_
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*🎒शाळेच्या वेळेत बदल नाही, पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच शाळा सुरू राहणार.*_
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*🎒राज्यातील शाळांची होणार झाडाझडती...आधी समज, नंतर शाळेची मान्यता रद्द!*_
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*🎒पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत*_
~~~~~~ *srk* ~~~~~~
June 15, 2025 10:55 PM
https://prahaar.in/2025/06/15/dignitaries-including-the-chief-minister-will-welcome-the-students-on-the-first-day/amp/
_*मुंबई :* राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार १६ जून, २०२५ रोजी शाळा सुरू होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे._
_तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक २३, किसन नगर, ठाणे तसेच शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळा, आंध्रा हायस्कूल जवळ, वडाळा या शाळेत उपस्थित राहतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे भेट देतील._
_शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, ता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे._
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*🎒शाळेच्या वेळेत बदल नाही, पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच शाळा सुरू राहणार.*_
~~~~~~ *srk* ~~~~~~
_मुंबई, दि. १५ जून २०२५: शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून, सर्व शाळा पूर्वीच्या नियमित वेळेनुसारच कार्यरत राहतील, अशी स्पष्ट माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. केशवराव जाधव यांनी SCERT चे संचालक मा. श्री. राहुल रेखावार (IAS) यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर दिली.गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर शाळांच्या वेळेत बदल होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, ज्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळाला पूर्णविराम देण्यासाठी श्री. जाधव यांनी SCERT संचालकांशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला. यावेळी श्री. रेखावार यांनी सांगितले की, शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पहिलीच्या वर्गाच्या अध्यापनाच्या दृष्टीने किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.या माहितीमुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे._
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*
_*🎒राज्यातील शाळांची होणार झाडाझडती...आधी समज, नंतर शाळेची मान्यता रद्द!*_
~~~~~~ *srk* ~~~~~~
*15 June, 2025, 07:15 AM*
_बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुरड्यांवर झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्या १६ जूनपासून शाळा सुरू होणार असून शाळांमध्ये नियमांची अंमलबजावणी केली की नाही याची झाडाझडती घेण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनाने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास आधी समज देण्यात येणार असून तरी अंमलबजावणी कडे कानाडोळा तर संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे._
_बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. पालकांनी बदलापूर स्थानकात आंदोलन केले._
_या प्रकरणातील संशयित आरोप अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला आणि न्यायालयाने ताशेरे ओढले. घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शालेय शिक्षण विभागाने कठोर नियमावली जारी केली आहे._
_*झाडाझडती होणारच...*_
_'लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२' हा केंद्र शासनाचा कायदा व सदर कायद्याखालील नियमावली केंद्र शासनाने १४ नोव्हेंबर २०१२ पासून लागू केलेली आहे._
_या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी १८ वर्षे वयोगटापर्यंतच्या व्यक्तीस बालक म्हणून समजण्यात आले आहे. मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आल्यास संबंधित शैक्षणिक संस्था व्यवस्थापन/शिक्षक व शाळा यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन अथवा विशेष किशोर पोलीस पथक यांना कळविणे बंधनकारक असणार आहे._
_*अत्याचाराची तक्रार करा!*_
_शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार पास्को इ-बाॅक्स व चिराग या ॲपवर करणे यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे आवश्यक ठरणार आहे. सर्व शाळा परिसरात कंपाऊंड वॉल, सकाळ, दुपारी व शाळा सुटताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद घ्यावी, विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना मेसेज करावा, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक, विद्यार्थी ज्या बसमधून ये-जा करणार त्या बसचालकाची पडताळणी, बसमध्ये जीपीएस प्रणाली बसवणे, प्रसाधनगृह व स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता ठेवणे आदी गरजेचे आहे._ *✥●⊱✧⊰●☬ॐ☬●⊱✧⊰●✥*
‼️ _*✒️ संकलन ✒️*_‼️
_*✒️ सतीश कोळी,शिक्षक समिती,*_ ‼️
‼️ _*महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP*_ ‼️
*_𝐇𝐚𝐯𝐞 𝐀 𝐍𝐢𝐜𝐞 𝐃𝐚𝐲_•─╼⃝𖠁*
*▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬*