.... بدلاؤ ضروری ہے ....
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 16, 2025 at 08:58 AM
💥💥💥💥💥💥💥💥 *शाळेच्या वेळेत बदल नाही, पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच शाळा सुरू राहणार.* ➖➖➖➖➖➖➖➖ *मुंबई, दि. १५ जून २०२५: शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून, सर्व शाळा पूर्वीच्या नियमित वेळेनुसारच कार्यरत राहतील, अशी स्पष्ट माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. केशवराव जाधव यांनी SCERT चे संचालक मा. श्री. राहुल रेखावार (IAS) यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर दिली.गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर शाळांच्या वेळेत बदल होणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या, ज्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळाला पूर्णविराम देण्यासाठी श्री. जाधव यांनी SCERT संचालकांशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला. यावेळी श्री. रेखावार यांनी सांगितले की, शाळांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. मात्र, पहिलीच्या वर्गाच्या अध्यापनाच्या दृष्टीने किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.या माहितीमुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा त्यांच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.* ➖➖➖➖➖➖➖➖ *सौजन्य -महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना.* ➖➖➖➖➖➖➖➖

Comments