.... بدلاؤ ضروری ہے ....
.... بدلاؤ ضروری ہے ....
June 19, 2025 at 03:59 AM
प्रति,         १.विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग,         २.उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व,         ३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).         ४.शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक ),जिल्हा परिषद,(सर्व)         ५.शिक्षण निरीक्षक (पश्चिम,दक्षिण,उत्तर)         ६.प्रशासन अधिकारी, (मनपा. नपा ) सर्व,         ७.शिक्षणप्रमुख (मनपा) 8. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व                  विषय: ११ वा आंतरराष्ट्रीय योग  दिन  २०२५  साजरा करणे बाबत....                   संदर्भ: श्रीमती अर्चना शर्मा अवस्थी, सहसचिव भारत सरकार यांचे पत्र क्र.D. O.                               No.१३-१/२०२५-IS.४  दि.६ जून २०२५               उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार  २१ जून २०२५  हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. या वर्षी ऐतिहासिक योग संगम हा कार्यक्रम सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळात पूर्ण देशभर विविध ठिकाणी साजरा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सामान्य योग प्रोटोकॉल म्हणजे योगाच्या सरावासाठी निश्चित केलेल्या पद्धती ह्या आयुष मंत्रालयाच्या IDY पोर्टलवर २२ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या वर्षीच्या योग दिनासाठीचा विषय “एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग” (Yoga for One Earth One Heath) असा आहे. आरोग्य, सुसंवाद आणि सजगता वाढीस लावणे असा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे.  योग दिन साजरा करणेसाठीचे इतर सर्व साहित्य व १० प्रमुख उपक्रम हे https://drive.google.com/drive/u/0/folders/1iRmU2qPHn0mjxGQyUYPJIX3Bt1oBIiMe या लिंकवर उपलब्ध आहेत. सदर उपक्रम शाळांमध्ये /संस्थांमध्ये आयोजित करण्यात यावा. शाळा किंवा संस्था त्यासाठी संदर्भीय पत्रामध्ये नमूद केलेल्या IDY च्या पोर्टलवर https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam  या लिंकवर  आयोजक म्हणून नोंदणी करू शकतात. तसेच केंद्र शासनाच्या सूचनेनुसार खालील प्रमाणे 🧘‍♂️ Join Yoga Sangam under IDY 2025! 🧘‍♀️ We request all schools, institutions, and individuals to register for the Yoga Sangam program as part of the International Day of Yoga (IDY) 2025 celebrations. 📲 Please scan the QR code above to complete the registration at the earliest. यासाठी आपल्या कार्य क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या ( पी एम श्री शाळांसह) सर्व शाळा/संस्था यांना दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत शाळा सुरू ठेऊन विद्यार्थी व शिक्षक, पालक व समाजातील इतर लोक यांचा जास्तीत जास्त सहभाग सदर उपक्रमात असावा याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करावे.            यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक (सर्व )यांनी आपल्या जिल्ह्यात एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. सदर नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांनी कार्यान्वित केलेल्या उपक्रमाबाबतची माहिती एकत्रित करून सोबत जोडलेल्या एक्सेल शीटच्या नमुन्यात ( PDF File नको ) इंग्रजी मध्ये  भरून ....... या इमेल आय डी वर दि. २२ जून २०२५ रोजी ठिक 11.00 पर्यंत पाठवावी.               महाराष्ट्रामध्ये सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर योग दिन कार्यक्रम आयोजित करणे याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून सूचित करावे. तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्यातील सदर कार्यक्रमाचा ... या इ-मेल आय. डी. वर अहवाल सादहार होईल याबाबत खात्री करावी.   संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत,पुणे-01.

Comments