MHT CET, JEE And HSC Board Exam
MHT CET, JEE And HSC Board Exam
May 22, 2025 at 12:13 PM
*महत्वाचे उद्यापासून इयत्ता अकरावी ऍडमिशन साठी महाराष्ट्र शासनाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केलेला आहे खालील सूचनांचा विचार करून आपल्या मुलाच्या/ मुलीचे ऍडमिशन साठी सर्वांनी प्रयत्न करावे ही नम्र विनंती 🙏* यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे यावर्षीपासून कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन प्रवेश नोंदणीची प्रक्रिया *सोमवार दि. १९ मे* पासून सुरू होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ शासकीय प्रवेश वेबसाईटवरून आपले रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. आपल्या जवळच्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये आपल्याला ही सुविधा उपलब्ध आहे. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस (11th FYJC Admission Registration Process) *१. वेबसाइटला भेट द्या* सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट [11thadmission.org.in](https://11thadmission.org.in/)वर जायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचे रहिवासी ठिकाणी निवडायचे आहे. ( आपण राहत असलेला तालुका ) *२. नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन* होमपेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय दिसेल. यात तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल ही वैयक्तिक माहिती भरायची आहे. यानंतर तुमचा १०वीचा सीट नंबर, वर्ष, बोर्ड ही माहिती भरायची आहे. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे द्या. यानंतर एक पासवर्ड ठेवून रजिस्ट्रशेन करा. *३. लॉग इन आयडी तयार* यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर तुमचा लॉग इन आयडी आणि अॅप्लिकेशन नंबर तयार होईल. हा नंबर तुमच्याजवळ ठेवा. *४. फॉर्म १ भरा (11th Admission Form 1)* यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर जाऊन लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. त्याची उत्तरे द्या. तुम्हाला तुमचा पत्ता, पालकांचे फोन नंबर,व्यवसाय याबाबत माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला SC/ST/OBC/EWS/OPEN कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. *५. कागदपत्रे अपलोड करा* यानंतर तुम्हाला दहावीचे मार्कशीट, रहिवासी पुरावा, जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेटदेखील अपलोड करावे लागेल. *६.रजिस्ट्रेशन फी भरा* यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ती भरु शकता. *7. फॉर्म २ भरा* यानंतर तुम्ही फॉर्म १ भरल्यानंतर तो फॉर्म लॉक करा. यानंतर पुन्हा एकदा लॉग इन केल्यावर तुमचे रहिवासी ठिकाण टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या आवडत्या कॉलेजची यादी विचारली जाईल. तुम्हाला जे कॉलेज हवे आहे त्याी यादी टाका. यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. *८. मेरिट लिस्ट* यानंतर मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. एकूण ३-४ मेरिट लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे. यानंतर तुमचा प्रवेश या कॉलेजमध्ये होईल त्या कॉलेजचे नाव तुम्हाला दिसू लागेल. जर तुम्हाला पहिल्या लिस्टमध्ये तुमच्या पसंतीनुसार पहिल्या क्रमांकाचे कॉलेज मिळाले तर तुम्हाला अॅडमिशन घ्यावी लागेल. जर तुम्हाला जे कॉलेज तुमच्या पसंतीनुसार प्राप्त झाले आहे त्यासाठी तुम्हाला अॅडमिशन घ्यायचे नसेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरु शकता. From *कैलास वाघमारे सर* *टेली हेल्पलाइन समुपदेशक मनोदर्पण शिक्षण मंत्रालय भारत सरकार* *शैक्षणिक मार्गदर्शक व समुपदेशक* *संपर्क 8459836739*

Comments