MHT CET, JEE And HSC Board Exam
MHT CET, JEE And HSC Board Exam
June 16, 2025 at 09:46 AM
सेवा सहयोग फाउंडेशनच्या सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, *जे विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील आहेत आणि दहावी व बारावीला चांगल्या श्रेणीत पास झाले आहेत व ते पुढील शिक्षण हे 'व्यावसायिक शिक्षण' (B.E., B. Tech., M. Tech., MBA, MBBS, BAMS, B. Farm, M. Farm., Nursing, MLS, Diploma in Engineering, IIT, IIM, etc.) घेत असतील अशा विद्यार्थ्यांना सेवा सहयोग संस्थेमार्फत आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते, म्हणजे त्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेश फी साठी आर्थिक सहकार्य सेवा सहयोग शिक्षण पूर्ण होईपर्यंत करत असते.* कृपया, अशा गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. सेवा सहयोगाची मदत मिळवण्यासाठी पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत. 1. सदर विद्यार्थी हा हुशार व गरजू असावा. 2. सदर विद्यार्थ्याचे दहावी व बारावीचे मार्क्स हे चांगले म्हणजे मेरिटमध्ये बसणारे असावेत 3. दहावी व बारावीनंतर सदर विद्यार्थ्याने फक्त आणि फक्त 'व्यावसायिक शिक्षण' (B.E., B. Tech., M. Tech., MBA, MBBS, BAMS, B. Farm, M. Farm., Nursing, MLS, Diploma in Engineering, IIT, IIM, etc.) घ्यावं. 4. विद्यार्थ्याने अर्ज केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या घरी सेवा शिक्षण सहयोगाचे स्वयंसेवक फेरतपासणीसाठी येतील. 5. त्यांच्या फेरतपासणीमध्ये सर्व अटी पूर्ण झाल्यावर ते तशा प्रकारचा अहवाल वरिष्ठांना सादर करतील व तेव्हाच सदर विद्यार्थ्याला मदत मिळेल. 6. तसेच सदर विद्यार्थ्याला प्रवेश फी ही त्याच्या बँकेच्या अकाउंटवर न मिळता त्याने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाच्या अकाउंट वरच त्याने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर जमा होईल. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अशा गरजू विद्यार्थ्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. प्रा. डॉ. विजय शिरसाठ 8329830887 प्रा. आकाश धुमाळ 9921111580 मा. गणेश आढाव 9011771211 प्रा. संदीप पाटील +918446238045 सौ.सुचित्रा पाटील +918999153898 कृपया, सदर पोस्ट गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. *_एक वेळेस भुकेलेल्याला भाकर देऊ नका, भिकाऱ्याला भीक देऊ नका, पण शिक्षण घेणाऱ्याला जरूर मदत करा. कारण त्याला शिक्षणासाठी मदत करून तुम्ही त्याच्या आयुष्याच्या भाकरीचा प्रश्न सोडवत असतात_.*
👍 ❤️ 3

Comments