
Devendra Fadnavis
June 20, 2025 at 02:22 PM
*CMO Maharashtra Tweets:*
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड)च्या विविध उत्पादनांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये कुकीज, मस्टर्ड सॉस, मखाना, मध इत्यादी 5 प्रकारच्या 'रेडी टु ईट' उत्पादनांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित 'सहकार से समृद्धि 2025' या राष्ट्रीय परिसंवादेच्या उदघाटनादरम्यान हा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

❤️
👍
🙏
♥
🚩
❤
36