
Paramhans Parivrajakacharya Shreemad Vasudevanand Saraswati (Tembe) Swami Maharaj (1854-1914)
June 19, 2025 at 12:30 AM
*श्री.प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा पदसंग्रह.*
+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:+:
*२०८. अभंग ऐतरेयभावार्थरूप*
विराटाच्या पोटीं देवता पडती । क्षुधातृषा मोठी व्यापी तयां ।।१।।
त्या म्हणती ईशा आम्हां दे शरीर । तेथ अन्नाहार पुरवूं आम्ही ।।२।।
गजाश्वादि देह देयि तयां देव । परि त्यांचा भाव तृप्त नोहे ।।३।।
शेवटी नृदेह देतां तृप्त होती । देवता वदती बरें झालें ।।४।।
🙏
❤️
👌
🙇♀
10