
Shivsena
June 20, 2025 at 12:15 PM
युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या 'कंटेंनरमधील शिवसेना शाखा' या उपक्रमाचे काल शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेना वर्धापनदिनी उद्घाटन करण्यात आले.
जिथे शिवसेनेच्या शाखा नाहीत तिथे कंटेंनर शाखेच्या माध्यमातून या शाखा सुरू करण्यात येणार आहेत. काल या उपक्रमाअंतर्गत पहिल्या दोन कंटेंनर शाखा पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये आणि वसंत चव्हाण यांना वितरण करण्यात आले. यावेळी या कंटेनर शाखांचे उद्घाटन करून शिंदे साहेबांनी त्यातील सोयी सुविधांची माहिती घेतली. युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील १०३ जिल्हाप्रमुखांना प्रत्येकी दोन या प्रमाणे २०६ कंटेंनर शाखांचे वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख व माजी आमदार रवींद्र फाटक, पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये आणि वसंत चव्हाण तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
#shivsena #eknathshinde #drshrikantshinde #yuvasena #purveshsarnaik
🙏
1