Shivsena

Shivsena

13.8K subscribers

Verified Channel
Shivsena
Shivsena
June 20, 2025 at 05:48 PM
‘सहकार से समृद्धि’ या विशेष राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन आज मुंबईत करण्यात आले होते. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा परिसंवाद पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब परिसंवादात सहभागी झाले. याप्रसंगी सहकार क्षेत्रातील 'नाफेडचे योगदान आणि सहकार चळवळीचे महत्त्व' या विषयावर आधारित लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच पाच पॅक्स संस्थांना 'नाफेड बाजार' फ्रँचायझी सुरू करण्यासाठी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आणि ५ एफपीओंना इक्विटी अनुदानाचा धनादेश देण्यात आला. यावेळी सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री मा. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार राज्यमंत्री मा. पंकज भोयर, नाफेडचे अध्यक्ष मा. जेठाभाई अहिर, महाव्यवस्थापक मा. अमित गोयल, व्यवस्थापकीय संचालक मा. दीपक अग्रवाल तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #amitshah #sahakarsesamriddhi #shivsena #eknathshinde #mumbai #maharashtra
🙏 1

Comments