
Shivsena
June 21, 2025 at 04:34 AM
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण संकुल येथे "सहकारी व शासकीय औद्योगिक वसाहती राज्यस्तरीय परिषदे'चे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी परिषदेला उपस्थित राहून जमलेल्या उद्योजकांसमोर आपले मनोगत मांडले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गौरव चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच या संस्थेच्या मुख्यालयाच्या नूतनीकृत इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणही मा.श्री. अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच संस्थेच्या प्रमुख विश्वस्त व सभासदांना यावेळी सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. यासोबतच महाराष्ट्र शासनाचा' कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास विभाग' आणि 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर' मध्ये यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मा. ललित गांधी आणि राज्यातील प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
#shivsena #amitshah #eknathshinde #maharashtra
🙏
1