Shivsena

Shivsena

13.8K subscribers

Verified Channel
Shivsena
Shivsena
June 21, 2025 at 09:00 AM
राम जन्मभूमीचा मुद्दा आणि शिवसेना - भाजप युती बाळासाहेबांच्या विचारांना यश मिळतंय असं पाहून भाजपने गांधी-प्रणित समाजवादाला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्ववाद सहर्ष स्वीकारला. जून १९८९ मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची हिमाचल प्रदेशात बैठक झाली. रामजन्मभूमीचा मुद्दा उचलून धरायचा आणि शिवसेनेशी युती करायची असे दोन प्रस्ताव कार्यकारिणीत मंजूर झाले. याच सुमारास श्री. लालकृष्ण अडवाणींकडे भाजपची सूत्रं आली. देशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्याच काळात मुंबईत झालेल्या भाजपच्या एका बैठकीत बाळासाहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून खास निमंत्रित करण्यात आलं होतं. या बैठकीत वंदनीय बाळासाहेबांचं स्वागत माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयीजी आणि श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांनी स्वत: केलं. #ramjanmabhoomi #shivsena #bhartiyajantaparty #balasahebthackeray #atalbiharivajpayee #lalkrishnaadvani
Image from Shivsena: राम जन्मभूमीचा मुद्दा आणि शिवसेना - भाजप युती  बाळासाहेबांच्या विचारां...
🙏 🚩 ❤️ 👍 8

Comments