
Shivsena
June 21, 2025 at 02:56 PM
शिवसेनेचा रौप्यमहोत्सव!
१९९१ साली शिवसेनेचा रौप्यमहोत्सव अत्यंत थाटात साजरा झाला. १९९० नंतर शिवसेनेचा दबदबा राज्यभर वाढू लागला होता. त्यानंतर हा रौप्य महोत्सव आल्याने शिवसेनेच्या राजकीय यशाची चर्चा देशभरातून होऊ लागली होती. त्या रौप्य महोत्सवानिमित्त शिवसेनेचे रायगड येथे दुसरे अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात (पहिली रांग, डावीकडून बसलेले) शिवसेना नेते श्री. मोरेश्वर सावे, श्री. लीलाधर डाके, श्री. दिवाकर रावते, श्री. छगन भुजबळ, श्री. मनोहर जोशी, श्री. प्रमोद नवलकर, श्री. दत्ताजी साळवी, श्री. मधुकर सरपोतदार, श्री. शरद आचार्य. (मागील रांग, डावीकडून बसलेले) श्री. वामनराव महाडिक, श्री. सतीश प्रधान, श्री. सुभाष देसाई या सर्व नेत्यांसमवेत मध्यभागी बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत.
#balasahebthackeray #shivsena #silverjubilee #maharashtra

❤️
🙏
6