Shivsena

Shivsena

13.8K subscribers

Verified Channel
Shivsena
Shivsena
June 22, 2025 at 10:24 AM
कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या 'सरहद्द शौर्यथॉन-२०२५' या स्पर्धेला झेंडा दाखवून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर शिंदे साहेबांनी कारगिल येथील ऑपरेशन विजयमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना मानवंदना दिली. तसेच कारगिल येथील युद्ध संग्रहालयाला भेट देऊन त्याचीही पाहणी केली. विशेष म्हणजे द्रास येथील सैन्यदलाच्या मुख्यालयात सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या 'लेझर शो'च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे मान्य केले होते. या निधीचा धनादेश देखील याप्रसंगी द्रास येथील तळाचे कोअर लेफ्टनंट कमांडर हितेश भल्ला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, भारतीय सैन्यदलातील प्रमुख अधिकारी, सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. #shivsena #eknathshinde #kargil
❤️ 🙏 😂 6

Comments