Online Shopping.... WhatsApp Channel

Online Shopping....

1 subscribers

About Online Shopping....

e-commerce Online Shopping...

Similar Channels

Swipe to see more

Posts

Online Shopping....
Online Shopping....
1/31/2025, 7:42:40 PM

---- नयन अडसुळ. तालुका भोर, जिल्हा पुणे. *पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...* *टप्पा १:- १९५० ते १९७५* *या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.* *सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...* *मोठे वाडे...* *दांडगा रुबाब...* *निसर्गावर चालणारी शेती...* *अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक,* *मिलिटरी भरती,* *पोलीस भरती झाले.* *तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.* *अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.* *नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...* *उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.* *हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.* *टप्पा २:- १९७५ ते १९९५* *देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला,* *१९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.* *शेतीची विभागणी सुरु झाली,* *२० एकराचे मालक ५ एकरावर आले.* *बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.* *शेती आता भांडवलदाराची होऊ लागली.* *विहिरी, मोटारी, पाईप लाईन आल्या.* *पाणी उपसण्याची स्पर्धा सुरु झाली.* *राजकारण गावागावात घुसलं.* *पुढारपणाच्या नादात अनेकांनी जमीनी कवडी मोलाने विकल्या.* *बाई-बाटलीत अनेकजण बरबाद झाले.* *स्पर्धा वाढली.* *आता नोकरी सोपी राहिली नाही.* *हायस्कुलवर नोकरीचा दर २० लाख झाला.* *वाढणाऱ्या गरजेपोटी जमिनी विकायला सुरवात झाली.* *२० एकराचा मालक मोकळा झाला व गावच्या कट्ट्यावर विड्या फुकू लागला,* *पोरं बेकार फिरू लागली.* *टप्पा ३:- १९९५ -२००९* *हा काळ मराठी माणसाच्या जबरदस्त घसरगुंडीचा काळ.* *परराज्यातून मोठया प्रमाणात लोक आले.* *मोठे उद्योग यांनी काबीज केले.* *हॉटेल शेट्टी लोक, दूध, पेपर, भाजीपाला, टॅक्सी, पाणीपुरी, किरकोळ दुकानदारी आदि उत्तरेतील लोकांनी काबीज केली.* *सहकारी कारखाने, बँका, पेट्रोल पम्प, बिअर बार, दारू दुकानें चाणाक्ष पुढाऱ्यांची झाली.* *मराठी माणूस मात्र अजूनही विहीर पाडणे, बोअर मारणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणे, भरतीला जाणे, पोराला हायस्कुल वर चिटकवणे ह्यातच गुंतलेला दिसला.* *२० एकर जमीन वाटण्या होऊन,* *मग विकून एकरावर आली तरी डोळे उघडतं नव्हते.* *अजूनही पाटीलकी व जमीनदारीच्या दिवा स्वप्नात रमला होता.* *टप्पा ४:- २००९ ते २०२०* *ग्लोबलायझेशन झाले,* *जगाचे पैसे भारतात आले.* *पुणे, मुंबई, इतर शहराजवळील जमिनींना किंमती आल्या.* *मग काय...?* *जमिनी विकायची स्पर्धाच सुरु झाली.* *राजकीय कार्यकर्ते एजंट झाले व मराठी माणसाचा 'मुळशी पॅटर्न' झाला.* *जमीनदारी संपली, पोरं बेकार किंवा पुणे-मुंबईत ८-१० हजारांच्या नोकऱ्या करू लागली.* *आता विकायलाही काही शिल्लक राहिलं नाही.* *खरी, बिकट गरिबी सुरु झाली.* *पोरांचा वापर शंभर-दोनशे देऊन राजकारणात सुरु झाला.* *बापाकडे लग्नाला पैसा नाही.* *मग पोरी हात धरून पळून जाऊ लागल्या.* *गावचा जमीनदार हमाली करू लागला.* *व्यापारी तृतीय म्हणायचे त्यांचेकडेच हे बडे जमीनदार, त्यांची पोरं ही वॉचमन, हमाली, क्लार्क, ड्रायव्हर अश्या नोकऱ्या करू लागली व जयंती साजरी करणेसाठी बड्या व्यापारी लोकांजवळ वर्गणी मागू लागली.* *टप्पा ५:- २०२० ते २०३०* *इथून पुढील काळ फक्त पैश्याचा असेल.* *ज्यांचेकडे पैसा तोच सरपंच, तोच आमदार.* *नोकरी हा विषय संपला आहे.* *नोकरी शोधणारा त्यातच म्हातारा होईल.* *उच्च जातीचा हताश होऊन बघत बसेल.* *पैसा न कामविणाऱ्याकडे एक गुंठासुद्धा शिल्लक राहणार नाही.* *शेती, नोकरीसह जो व्यवसाय करेल तोच काही कमवू शकेल.* *अजून वेळ गेली नाही.* *शेती सांभाळा शेती बरोबर जोडधंदे करा.* *नोकरी पेक्षा व्यवसाय करण्याचा विचार करा.* *जो चूक करतो तो माणूस,* *तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस,* *जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस.* *अजुन वेळ आहे झालेल्या चुका सुधारून त्याच चुका पुन्हा होणार नाहीत हे पहाण्यासाठी.* *आपल्या माणसाला साथ द्या,* *आपल्या माणसाला मोठ करा.* *आपल्या माणसाचे पाय ओढणे थांबवा.* *आपणच आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे.* *(सत्य परिस्थितीवर आधारीत असलेला हा लेख सोशल मीडियावरून घेतलेला...)* *मला आवडलेला आहे,* *आपणासही नक्कीच आवडेल बघा आपल्या पुढच्या पिढ्या वाचवता आल्या तर छानच...* 🪷 नयन सुरेश अडसुळ तालुका भोर, जिल्हा पुणे. *एक भयाण वास्तव...!* *🙏🙏🙏🙏🙏*

Online Shopping....
Online Shopping....
2/26/2025, 9:28:32 AM

@Social2Worx : सुकन्या समृद्धी योजना (SSY) काढण्यासाठी काय करावे लागेल ? सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही योजना भारत सरकारने मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी बचत करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आहे. खाली दिलेल्या स्टेप्सनुसार, तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेसाठी काय करणे लागेल ते स्पष्ट केले आहे: 1. पात्रता: मुलगी असावी: या योजनेचा लाभ फक्त मुलीच घेऊ शकतात. वयाची मर्यादा: मुलीचा जन्म त्याच वर्षात किंवा त्याआधी झाला असेल, परंतु खातं उघडताना तिचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असावे. बचत खातं उघडण्यासाठी वय: 0 ते 10 वर्षे वयाच्या मुलींसाठी या योजनेत खाता उघडता येतो. 2. अर्ज प्रक्रिया: खाता उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: मुलीचे जन्म प्रमाणपत्र पालकांचा (किंवा कुटुंब प्रमुखाचा) ओळखपत्र निवास प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) आधार कार्ड (जर असले तर) अर्ज कसा करावा: सुकन्या समृद्धी योजना खाते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत उघडता येईल. तुम्हाला संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये योजनेशी संबंधित अर्ज फॉर्म मिळेल. त्यात तुम्ही मुलीचे नाव, वय, जन्म तारीख, पालकांची माहिती इत्यादी भरून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. 3. न्यूनतम आणि उच्चतम ठेव रक्कम: न्यूनतम ठेव: ₹250 (वर्षभरात किमान ₹250) उच्चतम ठेव: ₹1,50,000 प्रति वर्ष तुम्ही या योजनेत दरवर्षी किमान ₹250 आणि जास्तीत जास्त ₹1,50,000 पर्यंत जमा करू शकता. 4. सुविधा आणि लाभ: करमुक्त व्याज: सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले पैसे पूर्णपणे करमुक्त असतात. जमा केलेले पैसे आणि त्यावर मिळणारे व्याज दोन्हीही आयकर अधीन नाहीत. व्याज दर: योजनेत दरवर्षी सधारण व्याज दर 7.6% (अंदाजे) आहे, पण हे दर सरकारने ठरवलेले असतात आणि बदलू शकतात. 20 वर्षे एकत्रित बचत: खाते उघडण्याच्या दिवशीपासून 21 वर्षे किंवा मुलीच्या विवाहासाठीच्या शंभर रक्कम काढता येते. 5. बचत कालावधी: या योजनेत खाते उघडल्यावर तुम्हाला 15 वर्षांपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर, खाते 21 वर्षांपर्यंत चालू ठेवता येईल, आणि त्यानंतर ती रक्कम काढता येईल. 6. रक्कम काढण्याची प्रक्रिया: खाते उघडल्यानंतर 21 वर्षांच्या आत, किमान 18 वर्ष वयाच्या नंतर रक्कम काढता येते, विशेषत: मुलीच्या उच्च शिक्षण किंवा विवाहासाठी. मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी 50% रक्कम काढता येते, परंतु तुम्हाला काही ठराविक कारणांसाठी काढता येईल, उदाहरणार्थ, शिक्षण, विवाह इत्यादी. 7. खात्याचा लाभ: योजनेची शेवटची रक्कम आणि त्यावर मिळालेले व्याज मुदत संपल्यानंतर काढता येते. सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज करणे सोपे आहे आणि या योजनेमुळे मुलींच्या भविष्यासाठी एक सुरक्षित आणि स्थिर आर्थिक आधार मिळवता येतो. @SOCIAL2WORX (Follow On X)

Link copied to clipboard!