
eKapte
635 subscribers
About eKapte
To create Awareness about business and social activities. सामाजिक आणि आर्थिक माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हाच उद्देश या चॅनलचे आहे.
Similar Channels
Swipe to see more
Posts

सुरुवातीपासून शासनाच्या प्रत्येक योजनाचा लाभ घेत उद्योग सुरू केला तर 100% पेक्षाही जास्त सबसिडी सहज शक्य आहे. https://youtu.be/U3ZylTavYF0

माझे व्हिडिओ एन्टरटेन्मेंट चे नाहीत, कोणावर टीका करणारे नाहीत, influencer नाहीत, मोटिवेशनल स्पीकर सारखे तर अजिबात नाहीत,पण ज्याला जीवन जगण्यासाठी उद्योग हा मार्ग निवडायचा आहे त्याला भरपूर काही देणारे आहेत किंबहुना सगळं काही देणारे आहेत. मला माहिती आहे की उद्योगाकडे वळणारे लोक 5% सुद्धा नाहीत पण या लोकांना हवी ती माहिती मिळवण्यासाठी भयानक कसरत करावी लागते आणि त्यांच्यासाठी माहितीचे व्हिडिओ बनवून मला आनंद मिळतो, TRP साठी बनवायचे असेल तर एन्टरटेन्मेंट अथवा motivational व्हिडिओ बनवता आले असते, 30 वर्षापासून ट्रेनर म्हणून काम करताना एवढे करणे तर मला खूप सोपे होते, पण आनंद त्यात नव्हता ज्यात TRP आहे त्यात होता जे या लोकांना मिळत नाही देण्यात आहे, म्हणून उद्योगाचा विचार आला की त्यांचा प्रवासावरील सर्व माहितीचे मी व्हिडिओ बनवतो मुळात या क्षेत्राकडे येणारे कमी आहेत,तर बघणारे, लाइक, शेअर, सबस्क्राईब करणारे कमीच असणार पण माझा आनंद माझ्याकडील देण्यात जास्त आहे. ©@eKapte® www.youtube.com/@eKapte

ओबीसी महामंडळाच्या योजना, लागणारे डॉक्युमेंट, ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि त्यानंतरची प्रोसेस याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत पहावे.#OBC https://youtu.be/Si-_Cg0zD-Q

CMEGP योजना मधे जो बदल झाला आहे आणि GR मध्ये जे दिले आहे त्यात व ऑनलाईन अर्ज मधे तफावत आहे. अर्ज करताना जो फॉर्म्युला टाकला आहे तो बहुतेक चुकून झाला असावा नेमके काय बदल आहेत समजून घ्या आणि व्हिडिओ इतर लोकांना व आपल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दाखवा म्हणजे दुरुस्ती होऊन लोकांचा फायदा होईल.https://youtube.com/shorts/NE4-WpLQ9nw?feature=share

CMEGP योजनेत 2025-26 मधे सुधारण करण्यात आले आहेत, 1 कोटी मर्यादा झाली आहे व इतर सुधारणा समजून घ्या https://youtu.be/lxm9GY0Q5VI

#NLM बाबतची संपूर्ण माहिती: https://www.youtube.com/playlist?list=PLyPlMtwgKwGwbWj4CS5dIRw7A0Zf0FdRZ

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. मात्र इतका महत्वाचा निर्णय असूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या निर्णयाची कोठेही जाहिरात केली जात नाही. मुंबई, पुणे, नाशिक व इतरही शहरातील वाहतूक पोलीस हा निर्णय जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत. मुदत संपल्यावर मात्र म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हेच इ-चलान मशीन घेऊन फौज रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड चलान मारतील! त्यांना HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP बसवून घ्या आणि ही माहिती आपले मित्र, नातेवाईक, ओळखीचे यांच्यापर्यंत पोहोचवा. शासन आदेश पाहण्यासाठी:- https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdf HSRP बुक करण्यासाठी भेट द्या :- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html अधिक माहितीसाठी video : https://www.youtube.com/watch?v=mna7XdZCoQc https://www.youtube.com/watch?v=M5J5OC_owr4 https://www.youtube.com/watch?v=N5H5fFUCigs