Weather Chat
377 subscribers
About Weather Chat
Maharashtra weather update
Similar Channels
Swipe to see more
Posts
सोमवार दि. १६ जून २०२५ ' मान्सून पुढे सरकला, परंतु पावसाचा जोर कोकणातच ' १- मान्सून- तीन आठवड्यापासून जाग्यावरच खिळलेला मान्सून पुढे सरकला असुन त्याने नाशिक नगर संपूर्ण खान्देश मराठवाडा व विदर्भ सह जवळपास उत्तरेचा काही भाग वगळता महाराष्ट्र आज काबीज केला आहे. २-पाऊस- मान्सून जरी पुढे सरकला तरी त्याच्या प्रवाहात सध्या म्हणावा असा विशेष जोर नाही. त्यामुळे बुधवार दि. १८ ते २५ जून पर्यन्तच्या आठवड्यात मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र जोरदार तर घाटमाथा व विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. ३- पेरणी- ज्या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या पावसाने भरपूर ओल आहे. आणि ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अश्या शेतकऱ्यांना पेरण्या करावयाच्या असतील तर, अश्या खान्देश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बुधवार दि. १८ ते बुधवार २५ जून आमावस्या पर्यंतच्या आठवड्यात काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता जाणवते. अर्थात पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यासह आपल्या विवेकावरच घ्यावा, असे वाटते. सोयाबीन सारख्या पिकाला बक्कळ ओल व पूर्ण उतार होण्याची शक्यता असली तरी उतारानंतर सिंचन साधनाची उपलब्धता असेल तरच पेरणीचा विचार करावा असे वाटते. कारण खान्देश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात येत्या आठवड्यात सूर्यप्रकाशही जाणवू शकतो. शिवाय तुषार सिंचनासारख्या थुई-थुई पडणाऱ्या पावसाची शक्यता ही कदाचित ह्या १८ जिल्ह्यात ह्या आठवड्यात जाणवणार नाही, असे वाटते. ४- कश्यामुळे जाणवत, ह्या आठवड्यात कमी पाऊस? मान्सून प्रवाहातील कमी ताकद आणि सध्या एमजेओ त्याची ग्लोबल फेरी पूर्ण करून भारत महासागरीय वि्षुववृत्तीय परीक्षेत्राच्या फेज २ व ३ मध्ये एमजेओ जरी कार्यरत असला तरी त्याचा ‘एम्प्लिटुड’ (वर्तुळ त्रिज्येसमान वर खाली होणारी कक्षा) किंवा दोलन(ऑसिलेशन क्रेस्ट व ट्रफची) विस्तृत वाढ- मर्यादेची पातळी(एम्प्लिटुड) ही एक पेक्षा कमी जाणवते, म्हणजे ती लहर मध्य रेषेजवळच रेंगाळतांना जाणवत आहे. त्यामुळे आपल्याकडील मान्सून बळकटीसाठी त्या प्रणालीच्या पूरकतेचा अभाव व त्याचबरोबर इतर ठोकळ स्पष्ट अश्या प्रणालीचा अभाव जाणवतो. त्यामुळे सध्या तरी अजुन आठवडाभर म्हणजे बुधवार दि. २५ जून पर्यन्त कदाचित खान्देश, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात सध्या तरी जोरदार पावसाठी चालना मिळण्याची शक्यता जाणवत नाही, असे वाटते. अर्थात वातावरणातील काही बदलच ह्यावर मात करू शकतो, व तसे झाल्यास, सूचित करता येईल. आज इतकेच! माणिकराव खुळे Meteorologist (Retd ) IMD Pune.
https://x.com/netwadhuri/status/1925522228134772869?t=4mkDevZyncBa6D_nJ3S2FQ&s=19
बुधवार दि. २१ मे २०२५ ' पुढील ४ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ' १-पुढील ४ दिवसात पावसाचा जोर अधिक कोठे असेल? उद्या गुरुवार दि.२२ ते रविवार दि. २५ मे पर्यंतच्या चार दिवसात मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छ.सं.नगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी ह्या ठिकाणी दुपारनंतर मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी ह्या जिल्ह्यात तर ह्या जोरदार पावसाचा प्रभाव सोमवार दि. २६ मे पर्यन्त ही राहू शकतो. ह्या कालावधीत विदर्भात मात्र तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीच शक्यता जाणवते. २- ह्या ३ दिवसातील पावसाचा जोर कश्यामुळे? अरबी समुद्रात कर्नाटक कि. पट्टी समोर तयार झालेल्या हवेच्या कमी दाब क्षेत्रातून, आवर्ती चक्रीय वाऱ्यांची निर्मिती व त्याचे उत्तरेकडे होणारे मार्गक्रमण ह्यातून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ३--महाराष्ट्रात अवकाळीचे हे वातावरण कधी पर्यन्त असेल? एकंदरीत जरी शनिवार दि. ३१ मे पर्यन्त पावसाचे वातावरण असले तरी गुरुवार दि. २९ मे पासून महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण काहीसे निवळण्याची शक्यता जाणवते. अर्थात मान्सूचे केरळातील आगमनाची तारीखच ह्याची दिशा ठरवेल. ४-अवकाळी पावसाच्या ओलीवर आगाप पेरणीसाठी धाडस करावे काय? अवकाळी पावसाची स्थिती सध्या जरी चांगली वाटत असली तरी, प्रत्यक्षात मान्सून चे महाराष्ट्रात आगमन केंव्हा होते आणि आगमनानंतर त्याच्या वितरणाची स्थिती व मान्सून च्या पावसावर मिळालेल्या ओलीची खोली ह्यावर हे ठरवता येईल. त्यामुळे महाराष्ट्रात ह्या पावसामुळे केवळ पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. परंतु कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी, एखाद्या-दोन सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, असे वाटते. आज इतकेच! माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune.
Looks like some weather's brewing! ⛈️ IMD Mumbai just issued a nowcast at 1 PM IST: ⚠️ Next 3-4 hours: Expect thunderstorms with lightning, moderate rain, and gusty winds (40-50 kmph) in Pune, Satara, Ahilyanagar, Raigad, Nashik & Chhatrapati Sambhajinagar. ⚠️ Next 3-4 hours: Expect thunderstorms with lightning, light rain, and gusty winds (30-40 kmph) in Jalgaon, Jalna, Beed, Solapur, Sangli, Sindhudurg & Dharashiv. Stay safe if you're heading out!
https://x.com/netwadhuri/status/1925528612985270348?t=AKK8kAP3N_S1M-EvRycT1w&s=19