
मराठामार्ग
January 25, 2025 at 06:33 AM
*आजपासून सामूहिक आमरण उपोषण सुरू*
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे सहकाऱ्यांसह सामूहिक आमरण उपोषण सुरू केले आहे.
*प्रमुख मागण्या*
- सगेसोयरेची अंमलबजावणी करावी
- मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत
- हैद्राबाद, सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंट, औंध संस्थानचे गॅझेटिअर्स लागू करावे
- आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत सरकारने बंद केली आहे. ती सुरु करावी व कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत रुजू करून घ्यावे
- स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी.
- तसेच स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठा सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो उपोषणकर्ते व मराठासेवक आंतरवाली सराटी येथे दाखल झाले असून आंदोलन ठिकाण भरून गेले आहे. तसेच हजारो मराठासेवक महाराष्ट्रभरातून दाखल होणार आहेत.
*एक मराठा.. लाख मराठा!*
*मराठामार्ग* 🚩
मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
👍
❤️
🙏
🚩
💪
😂
🔥
🍺
🎉
😄
393