
Dr. Anil Bonde
February 8, 2025 at 05:00 AM
*निषेध..निषेध..निषेध..!*
देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या बद्दल कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केलेल्या व्यक्तव्याचा अमरावती आदिवासी समाजातर्फे निषेध करण्यात आला. दलित आदिवासी महिलेबद्दल गांधी परिवाराने केलेल्या व्यक्तव्यातून काँग्रेसची मानसिकता दिसून येते. कित्येक वर्षे देशावर राज्य केलेल्या काँग्रेसला, गांधी घराण्याची राजवट आणि त्यांची गुलामी करणारे लोक कोणत्या मानसिकतेमधून देशाला चालवत होते, याची प्रचिती या प्रसंगातून होते.
#droupadimurmu
👍
❤️
🙏
4