
Dr. Pareexit Shevde
January 24, 2025 at 03:37 AM
#महत्त्वाचे
निरीक्षण ४
टोचणीच्या दुष्परिणामांची नोंदणी नीट करण्यात आली नाही.
ब्रॅड वेंस्ट्रप कमिटीने दिलेला अहवाल.
टोचणीच्या दुष्परिणामांची नोंदणी करण्याची व्यवस्था पुरेशी नव्हती आणि त्यात कित्येक कमतरता होत्या. जगातल्या जवळपास प्रत्येक देशात हीच परिस्थिती असल्याने कित्येक दुष्परिणाम आणि मृत्यू हे नोंदलेच गेले नाहीत. तरीही जे नोंदले गेले त्यांची आकडेवारी पाहता; १९९०-२०२२ या १२ वर्षांच्या कालावधीतील जगातील सगळ्या टोचण्यांमुळे मिळून जितके मृत्यू झाले त्याच्या सुमारे दुप्पट मृत्यू २०२०-२२ या दोन वर्षांत को*ड टोचणीमुळे झाले तर सुमारे चार पट अधिक दुष्परिणाम झाले असे अहवालात नमूद केले आहे.
अमेरिकन एफडीए च्या तत्कालीन कमिशनर डॉ. जनेट वुडकॉक यांनी “द न्यूयॉर्क टाइम्स”ला दिलेल्या मुलाखतीत सदर दुष्परिणाम हे दुर्मिळ पण गंभीर आणि आयुष्य बदलवून टाकणारे असल्याचं सांगितलं. यात गुलियन बरे सिंड्रोम, सततचा थकवा, निद्रानाश, गोंधळ उडणे अशा कित्येक न्युरोलॉजिकल त्रासांचा समावेश होता. यातले कित्येक त्रास हे कोणत्याही निदान चाचणीवर प्रत्यक्ष सिद्ध करता येत नसल्याने टोचणी दुष्परिणाम म्हणून नोंदवले गेले नाहीत असंही त्यांनी कमिटीला सांगितलं.
------------------------------------
आम्ही काय सांगितलं होतं?
केवळ mRNA च नाही तर कोणत्याही को*ड टोचणीचे दुष्परिणाम होणार आहेत. ते विशेषत: हृदयरोग, मासिक पाळीचे आजार आणि न्युरोलॉजिकल स्वरूपाचे अधिक दिसत आहेत. गुलियन बरी सिंड्रोमचं तर नाव घेऊन धोका दाखवला होता.
टोचणी दुष्परिणाम कुठे नोंदवायचे याबाबत पारदर्शकता नाही, जनतेला पुरेशी माहितीही नाही. यामुळे घडलेले दुष्परिणाम हे टोचणीमुळे घडले आहेत असं अधिकृतपणे समोर येणार नाही.
(क्रमश:)
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
😢
🙏
😮
👆
😳
🪔
48