Dr. Pareexit Shevde WhatsApp Channel

Dr. Pareexit Shevde

3.4K subscribers

Similar Channels

Swipe to see more

Posts

Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
5/29/2025, 3:24:47 AM

#महत्त्वाचे अमेरिकेतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पीटर मॅकलॉ यांनी सिनेटसमोर केलेल्या गौप्यस्फोटात जगातील सगळ्यात मोठ्या शवविच्छेदन निरीक्षण अहवालानुसार को*ड सुई टोचल्यावर झालेल्या मृत्यूंपैकी ७४% मृत्यूंचे कारण सुई होती असं सांगितलं. याबाबतची संशोधनं पारदर्शकपणे होत नाहीत; कारण अनेकांचे आर्थिक हितसंबंध त्यात असतात असंही त्यांनी सांगितलं! इतकंच नाही; या सुयांवर "मृत्यू" हा धोका ठळकपणे नमूद करण्यात यावा असंही मत या प्रसंगी अन्य तज्ज्ञांनी मांडलं. HHS अध्यक्ष RKF Jr. यांनी इथून पुढे सुयांची जबरदस्ती कोणावर होऊ नये याकरता धोरण स्पष्ट ठेवलं जाईल म्हणून सांगितलं आणि काही मोठ्या कंपन्यांच्या फ्लू किंवा तत्सम सुयांच्या करारावर कुऱ्हाड मारली. आपल्याकडे तर वेगळ्या प्रकारच्या सुया होत्या. आपला याच्याशी काही संबंध नाही....भूतकाळ पाहता; असा बालिश युक्तिवाद काहीजण करू शकतील. जगभरातील १ कोटी व्हायरल वेक्टर सुई (आपल्याकडे सर्वात जास्त दिली तीच ती!) वरील निरीक्षणं असं सांगतात की; टोचणीनंतर हृदयाचा दाह, रक्तात गाठी आणि GBS होण्याची शक्यता सुई घेतल्यावर अडीच ते तीन पटीने वाढते. आपल्या देशात किती मोठ्या लोकसंख्येने सुई घेतली आहे हे पाहता १ कोटी हा फार लहान सँपल साईज आहे. देशात हे साईड इफेक्ट्स नोंदवण्याची सक्षम प्रणाली असती तर आणखी वेगवेगळे आकडे समोर आले असते. आकडे जमा न करताच जगभरातल्या संशोधनाकडे दुर्लक्ष करणं ही अफाट वैज्ञानिकता आहे! या सुईला युरोपमधून बहुतांशी हद्दपार करण्यात आलं होतं हे लक्षात घ्या. सुई घेतली असेल तर HS CRP ही चाचणी करून घ्या; अशी पोस्ट मी पहिल्यांदा सुया आल्या तेव्हाच लिहिली होती. या चाचणीचे उपचार पूर्वी वाढलेले आणि नंतर कमी झालेले असे अनेक रिपोर्ट्स इथे शेअर केले होते. अनेक सेमिनार मधून आयुर्वेदाच्या विद्यार्थी/ वैद्यांसमोरही हा विषय पुराव्यांसह मांडला होता. आमच्या पाश्चात्य वैद्यकातील काही मित्रांनी या चाचणीची काही आवश्यकता नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. आज कोणत्याही आघाडीच्या ब्लड टेस्ट पॅकेजमध्ये या चाचणीचा समावेश असतो; जो यापूर्वी नव्हता! आम्ही reel वाले लोक नाही; real वाले लोक आहोत. आम्ही क्लिनिकल काम करत असतो. कोणत्याही लाभाची अपेक्षा नसताना वेळेत आपल्याला सजग करत असतो. लक्ष द्यायचं की नाही हा तुमचा निर्णय! "आता घेऊन तर झाली. आता काय करू?"......इथून पुढे तरी विचार करत जा आणि इथून पुढे कोणताही Autoimmune त्रास सुरू झाला तर या सगळ्या अवस्थांत काम करण्याचा अनुभव असलेला कोणीही वैद्य गाठा! "आयुर्वेद ही जीवनशैली आहे" वगैरे सगळं योग्य. पण "उपचार" म्हणून आयुर्वेदाकडे जितक्या लवकर याल तितका लाभ आहे हे विसरू नका! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

👍 🙏 ❤️ 👌 😮 💯 🤔 92
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
5/14/2025, 12:09:41 PM

आत्मपरीक्षणाची आवश्यकता! "आयुर्वेद दिवस" ही संकल्पना जाहीर झाली ती राष्ट्रीय पातळीवर. योग दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो तसाच आयुर्वेद दिवसही व्हावा अशी इच्छा आमच्यासारख्या काही वैद्यांनी जाहीर बोलून दाखवली तसेच योग्य मार्गाने योग्य ठिकाणी पोहचवलीदेखील. काल जाहीर करण्यात आल्यानुसार इथून पुढे २३ सप्टेंबर हा "आयुर्वेद दिवस" साजरा करण्यामागे "जगभरात हा दिवस साजरा करण्यात अडथळे येऊ नयेत आणि सोयीचे जावे" हा उद्देश असल्याचं केंद्र शासनाने नमूद केलं आहे. हा दिवस जगभरात नेण्याच्या हालचालींना वेग का आला असावा? आयुर्वेद हा soft diplomacy चा भाग असल्याचं मी वेळोवेळी लिहिलं आहे. भारत हा पाश्चात्य वैद्यकाच्या औषधांचं उत्पादन करण्यात आघाडीवर असलेला देश आहे. मात्र जगातला एक मोठा टक्का पारंपरिक उपचार पद्धतीचा अवलंब करणारा आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत चालली आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वेनुसार आपल्या देशात सुमारे ९०% लोक दैनंदिन आयुष्यात आयुर्वेदाचा काही ना काही उपयोग करतात. जगाचा विचार करता हा आकडा वाढत आहे. गेली पाच वर्षे नियमितपणे करत असलेल्या ऑनलाईन / टेलीकन्सल्टेशन वरून याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेत आहे. मात्र जगाच्या पाठीवर पारंपरिक उपचार पद्धती म्हटलं की त्याची आर्थिक उलाढाल पाहिल्यास क्रमांक एक चिनी पारंपरिक उपचार पद्धतीचा आहे. त्या खालोखाल आयुर्वेद असला तरी यातली तफावत फारच मोठी आहे. ही दरी २०३० पर्यंत अर्ध्याने कमी करण्याचा विद्यमान केंद्र शासनाचा उद्देश आहे. Attack where hurts ही नीती जशी शस्त्रास्त्र उत्पादनात “भारतीय” बनावट म्हणून वापरण्यात आली तसंच ड्रॅगनच्या औषध क्षेत्रातल्या वाटचालीचा सामना करण्यासाठी आयुर्वेद हा soft diplomacy चा भाग आहे. म्हणूनच यावर्षीपासून हा दिवस जगात अधिक पोहचवण्याचा मनसुबा असल्याचं शासनातल्या खात्रीलायक स्रोतांकडून कळलं. या दूरदृष्टीसाठी देशाच्या नेतृत्वाचं अभिनंदन करायलाच हवं! आत्मपरीक्षण कोणी आणि कुठे? – स्वतः शासनाने! हो…. केवळ दिवस साजरे करून किंवा विविध उत्पादने इतकंच मर्यादित राहिल्यास आपल्याला चीनी बाजारपेठेचा सामना करता येणार नाही. ज्या पातळीवर चीनमध्ये सरकार पैसे ओतून आजच्या विज्ञानाच्या परिभाषेत समजतील असे रिसर्च पारंपरिक उपचार पद्धतीत करत आहे त्याकडे लक्ष आणि प्रयत्न असायला हवे. – आयुर्वेदीय वैद्यांनी; जगाच्या स्पर्धेत उतरायचं असल्यास जगाच्या भाषेत जितकं शक्य तितकं आपलं शास्त्र मांडता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडच्या कामांचे चोख पुरावे ठेवायला हवेत. जगात काय घडतंय आणि आपण त्यावर उत्तर कसं देऊ याकडे लक्ष द्यायला हवं. आमच्याकडे याच पद्धतीने काम सुरू असल्याने विविध प्रकारच्या गंभीर आणि दीर्घकालीन रोगांवर उपचार देणं आणि त्याला यशस्वीपणे इतरांसमोर मांडणं शक्य होत आहे. उदा. Autoimmune disease मध्ये सुई टोचल्यावर वाढ होणार हे आपण तीन वर्षांपूर्वीच सांगत होतो; आणि आज या अवस्थांवर आपल्याकडे भरपूर रुग्ण आहेत. दुसरं म्हणजे; आपण अधिकाधिक documented clinical काम करण्याकडे लक्ष द्यायला हवं. केवळ reels बनवून काम भागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाश्चात्य वैद्यकपेक्षा काय अधिक देऊ शकता हे सप्रमाण आणि भीडभाड न बाळगता सांगायला हवं. रामदेव बाबांकडून यातला थोडा धडा घ्यायला हरकत नाही! – “ठराविक” भाजप समर्थकांनी….सगळे नाही. निवडकच बरं! केंद्र शासन काहीएक दूरचा विचार करून धोरण आखत असताना जे समर्थक सातत्याने आयुर्वेदाबाबत नकारात्मकच नव्हे तर खिल्ली उडवणारं लिखाण करत असतात त्यांना अजूनही आपला अभ्यास वाढवण्याची आणि आयुर्वेदाला उपयुक्त ठरणारी कामं करण्याची ही चांगली संधी आहे. आयुर्वेदाला पाठिंबा देणारे अन्य लोकं याबाबत त्यांच्याशी चर्चा करू शकतात. – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही! हो हो; तुम्ही वाचकांनीही थोडंसं आत्मपरीक्षण करायला हवं की! तुम्ही दैनंदिन आयुष्यात आजारी पडू नये म्हणून आणि आजारी पडलाच तर उपचारांत पहिला पर्याय म्हणून आयुर्वेदाचा विचार करता का? तो करायला सुरू करायची हीच वेळ आहे. छे…..हे काही soft diplomacy वगैरे म्हणून सांगत नाहीये. भावनात्मक म्हणूनही सांगत नाहीये. पण आयुर्वेद ही प्रभावी, दुष्परिणाम / साइड इफेक्ट्स न करणारी आणि अतिशय वेळेत रिझल्ट देणारी भारतीय उपचार पद्धती आहे; म्हणून! गरज पडेल तिथे पाश्चात्य वैद्यकच कशाला? अगदी संगीत चिकित्सादेखील वापरायला हरकत नाही असं माझं मत आहे. त्यात कशाला उगाच इगो ठेवायचा? पण आयुर्वेद उपचार वेळेत घेतले तर अन्य कसली शक्यतो गरजच पडत नाही हा आजवरचा डोंबिवली, पुणे येथील प्रत्यक्ष रुग्णसेवा आणि ऑनलाईन / टेलीकन्सल्टेशन मधून हजारो पेशंटचा अनुभव आहे. एकुणात काय? आयुर्वेदाचा हा अमृतकाळ आहे. मात्र आपल्या प्रत्येकाच्या त्यातल्या भूमिकेबाबत आत्मपरीक्षणाची ही सुसंधी आहे. – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

Post image
👍 ❤️ 💯 😢 🙏 56
Image
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
5/28/2025, 8:12:20 AM

#महत्वाचे गेल्या पाच वर्षांत आपण विसरले असू म्हणून पुन्हा एकदा छोटीशी आठवण; सध्या..... १. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा / मास्कचा वापर करा. को*ड / सुईमुळे फुफ्फुसांना झालेली इजा, COPD, Fibrosis, दमा किंवा रोगप्रतिकार क्षमता कमी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घ्या. २. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं अंगावर न काढता; को*ड (श्वसनक सन्निपात - हा शब्द लक्षात ठेवा) मध्ये उपचार देण्याचा अनुभव असलेल्या आपल्या जवळील वैद्यांचा तत्काळ सल्ला घ्या. ३. वैद्यांकडे जाताना आपल्याला लक्षणे असल्यास; स्वतः न जाता शक्यतो आपल्या थेट संपर्कात न आलेल्या व्यक्तींना किंवा अन्य कुटुंबियांना पाठवा. ४. एरव्हीही सध्या लॅब, डॉक्टर अशा ठिकाणी जाताना मास्कचा उपयोग करा. ५. नियमित व्यायाम, प्राणायाम करा आणि आहारात दूध, दही, ताक, फळे हे पदार्थ कमीत कमी ठेवा. गेल्या महिन्यापासूनच रुग्ण सुरू झाले आहेत. ज्या रुग्णालयांनी सहमती / ना हरकत दिली तिथे मागच्या वेळसारखे ICU मध्येही काम सुरू झाले आहे. सध्या तरी वर दिलेली काळजी पुरेशी आहे. अधिक काही वाटलंच वेळोवेळी कळवू. तोवर; काळजी करू नका. काळजी घ्या! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

👍 🙏 ❤️ 71
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
5/23/2025, 2:54:01 AM

विद्येचे दोन प्रकार दर्शनात सांगितले आहेत. परा विद्या आणि अपरा विद्या. परा म्हणजे परब्रह्माचे ज्ञान; तर अपरा म्हणजे शब्दब्रह्मज्ञान. चारही वेद आणि सहा वेदांग हे मिळून तयार होणारी विद्या अपरा. तिचं सार म्हणजे; ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्। यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्।। भगवद्गीता ८/१३ पुन्हा; प्रणवः सर्ववेदेषु| असं सांगत ओंकार आपण स्वतःच आहोत असं भगवंत सांगतात. या शब्दब्रह्माचं आकलन म्हणजे अपरा. अपरा म्हणजे नदीचा दुसरा पार. भवसरिता पार करायची असेल तर नामसंकीर्तनाला पर्याय काय? अपरा म्हणजेच नाळदेखील! आदि शंकराचार्य म्हणतात; पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम्। इह संसारे बहुदुस्तारे कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥ सातत्याची जन्ममृत्यूची नाळ तोडायची असेल तर हरिनामाच सर्वस्व आहे. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम् । कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा॥ कमी चर्चा, अधिक उपासना! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति अपरा एकादशी 🚩

🙏 ❤️ 👍 👌 🌿 97
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
2/26/2025, 2:17:33 AM

महाशिवरात्री 🚩 त्रिदेवांत केवळ महादेवांच्या पत्नीने त्यांना विविध प्रश्न विचारून विविध विद्या प्रकट केलेल्या आढळतात. कधी हा संवाद शिव पार्वती म्हणून, कधी महादेव महादेवी म्हणून, तर कधी भैरव भैरवी स्वरूपात होताना दिसतो. जगदंबिकेला ‌ज्ञात नाही; असं काहीतरी असेल का? पण तरीही साधकांना सुकर व्हावं म्हणून संवाद स्वरूपात हे ज्ञान तिने उलगडून दाखवलं आहे. रसशास्त्राचे अनेक संदर्भही अशा संवादांत मिळतात. 'शिव शक्ति' मीलनातून सृष्टीउत्पत्ती होते. याकरताच अन्यत्र विधान नसलेली विवाह दिनाची साधना म्हणजे महाशिवरात्री. शिवाने निर्गुणातून सगुण साकार स्वरूपात व्यक्त होण्याची रात्र; शिवाने तांडवातून अक्षय्य ऊर्जा निर्माण करण्याची रात्र; सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान या पाचही स्वरूपांत साधकांवर आणि पांचभौतिक जगावर अनुग्रह करण्याची रात्र! महादेव महादेव महादेवेति यो वदेत्। एकेन मुक्तिमाप्नोति द्वाभ्यां शम्भुऋणी भवेत् || - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

🙏 ❤️ 👍 🪔 84
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
2/25/2025, 10:32:11 AM

#महत्त्वाचे इच्छा असूनही कुंभाला जाता आलं नाही म्हणून चुटपुट लागली आहे? उद्याची रात्र ही कमतरता भरून काढू शकेल! आपल्या शरीरातल्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याची संधी चुकवू नका. इडा, पिंगला आणि सुषुम्ना हा आपल्या शरीरातला त्रिवेणी संगम आहे. महाशिवरात्रीला इडा, पिंगला या नैसर्गिकरीत्या अधिक सचेतन असतात. तर सुषुम्नेला आपल्या साधनेची जोड दिल्यास काही अभूतपूर्व अनुभूती मिळू शकते. शक्य आहे त्यांनी दिवसभर उपवास करा. शक्य नाही असे; रुग्ण, गर्भिणी, बाल आणि वृद्ध यांनी तेही करण्याची आवश्यकता नाही. शिवमहिम्न, शिवसहस्रनाम यांचं दिवसभर यथाशक्ति पठण, श्रवण करू शकता. रात्रीच्या चारही प्रहरांत देवघरातल्या शिवपिंडीवर अभिषेक करताना नम: शिवाय हा पंचाक्षरी मंत्र किंवा मृत्युंजय मंत्राचं मनन करू शकता. चारही प्रहरांत शक्य नसलेल्यांनी किमान रात्री साडेबारा ते दीड ही वेळ चुकवू नये. ज्या आयुर्वेद विद्यार्थी / वैद्य यांच्यासाठी खास; दूध + साखर आणि नंतर जल असा अभिषेक महादेवांना करणे इष्ट. अभिषेकसमयी अघोर मंत्राचा जप लाभदायक. चारही प्रहरांत किमान एक अभिषेक करा. अगदीच अशक्य असल्यास रात्री साडेबारा ते दीड ही वेळ मुळीच चुकवू नका. वर सांगितलेलं "किमान" गटात आहे. "अधिकस्य अधिकं फलम्|" - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

🙏 ❤️ 👍 👏 😮 🪔 80
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
2/20/2025, 3:19:38 AM

#महत्त्वाचे नियमित नामस्मरण करताय? या दहा गोष्टी कटाक्षाने टाळा! पद्म पुराणात दहा 'नाम अपराध' वर्णन केले आहेत. नामस्मरण करणाऱ्यांनी आपल्याकडून ते घडू नयेत म्हणून सजग असणं आवश्यक आहे. १. सन्निन्दा इतर भगवद्भक्तांची किंवा सज्जनांची निंदा करणे. २. असति नामवैभवकथा ज्यांना भक्तिभाव / श्रद्धा नाही. किंवा जे नास्तिक आहेत त्यांच्यासमोर नामस्मरणाचे गुणगान करणे. ३. श्रीशेशयोर्भेदधी: शिव आणि विष्णू हे भिन्न आहेत असे मानणे. उभयो: प्रकृतिस्त्वेका प्रत्ययभेदेन भिन्नवद्भाति। कलयति कश्चिन्मूढो हरिहरभेदं विना शास्त्रम्॥ हरि आणि हर यांची प्रकृती एकच असून प्रत्ययभेदाने ते भिन्न भासतात. ही सत्यस्थिती न जाणणारे मूर्ख मात्र हरि हर भेद करत राहतात. ४. ५. ६. अश्रद्धा श्रुतिशास्त्रदैशिकगिराम् श्रुति म्हणजेच वेद, शास्त्र म्हणजेच अन्य सर्व धर्मग्रंथ आणि गुरु यांच्या वचनांचा अनादर करणे. ७. नाम्र्यर्थवादभ्रम: म्हणजे नामस्मरणाबाबत फारच वाढून चढवून सांगितले जाते आणि प्रत्यक्षात इतक्या सोप्या गोष्टीने कसा काय लाभ होईल? अशी शंका घेणे. ८. ९. नामास्तीति निषिद्धवृत्तिविहितत्यागौ एकीकडे नामस्मरण करत दुसरीकडे पापकर्म करत राहणे किंवा नामस्मरण केल्यानेच सारे काही होईल अशा मानसिकतेत जाऊन विहित कर्मांचा त्याग करणे. १०. धर्मान्तरै: साम्यम् "नामस्मरण करा वा करू नका; आपलं कर्म नीट करत रहा. तेही पुरेसं आहे." अशी धारणा ठेवत नामाच्या महतीला नाकारणे. गुरू उपदेश किंवा कुल उपासना किंवा व्यक्तिगत प्राक्तन यांनुसार जे कोणतंही नाम नित्यनेमाने घेत असाल; त्यात वरील गोष्टी टाळल्या जाणं आवश्यक आहे. शक्य झाल्यास एकेका मुद्द्यावर थोडं अधिक विस्ताराने लिहीन. तूर्त इतकंच! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

🙏 ❤️ 👍 💯 🚩 🪔 110
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
2/18/2025, 3:34:34 PM

#वैद्यराज "वैद्यराज; हा माझा भाऊ आहे. माझ्या उपचारासंदर्भात त्याला काही शंका आहेत. विचारू दे?" "हो. अगदी जरूर." वैद्यराजांनी हसत परवानगी दिली. "माझा भाऊ तुमच्याकडे पोटासाठी उपचार घेतोय. त्याला तुम्ही चक्क रोज हनुमान चालीसा म्हणायचा सल्ला दिलात? हे असं मंत्र तंत्र सांगणं कितपत वैज्ञानिक वाटतं तुम्हाला वैद्यराज?" "अरे; त्याचा पचनाचा त्रास मानसिक ताणामुळे आहे. म्हणून त्याला आपण तो सल्ला दिला." वैद्यराज नेमकेपणाने बोलले. "अहो ही तर तुम्ही तुमच्या सल्ल्याची पाठराखण करताय. आजच्या विज्ञानाच्या युगात हे शोभतं का?" भाऊ आता वैतागू लागला होता. "Box breathing navy seal method हे शब्द ऐकले आहेस?" वैद्यराजांनी सौम्य शब्दांत विचारलं. "हो. ४ सेकंद प्रत्येकी श्वास आत घ्या, धरून ठेवा, बाहेर सोडा आणि पुन्हा धरून ठेवा. पण त्याचा इथे काय संबंध?" "या पद्धतीवर आजच्या तुझ्या विज्ञानाने संशोधन करून मानसिक ताण कमी करायला याचा उपयोग होतो म्हणून सांगितलं आहे ना?" वैद्यराजांनी उत्तर न देता प्रतिप्रश्न केला. "हो सांगितलं आहे. प्रयोगच झाले आहेत तसे. आम्ही प्रयोग करून मगच मान्यता देतो. पण त्याचा हनुमान चालीसा पठणाशी काय संबंध?!" आता मात्र भाऊ चांगलाच त्रासला होता. "तुझ्या भावाला विचार बरं मी कशा पद्धतीने हनुमान चालीसा म्हणायला सांगितली?..... जय हनुमान ज्ञान गुन सागर। (श्वास हळूहळू आत घ्या) जय कपीस तिहुं लोक उजागर।। (श्वास रोखून धरा) रामदूत अतुलित बल धामा। (श्वास हळूहळू सोडा) अंजनि-पुत्र पवनसुत नामा।। (श्वास रोखून धरा) मिळाले ना तुझ्या विज्ञानाने सांगितलेले फायदे? यावरही संशोधन झालंय बरं! कुठे ते आता तू शोधून काढ. माझं काम माझ्या पेशंटची काळजी घेणं आहे. तुझ्या वैज्ञानिक paramameter वरही ती झाली आणि आम्ही मारुतीरायाला "मनोजव" असं म्हणतो. त्यामुळे आमच्या श्रद्धेनेही ते काम करतीलच याची खात्री आहे. झालं का शंका निरसन? तुझी परवानगी असेल तर पुढचा पेशंट तपासायला घेऊ?!" - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

Post image
👍 ❤️ 🙏 🪔 121
Image
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
2/23/2025, 3:40:47 AM

#वैद्यराज "आईला लिव्हरसाठी तुम्ही जी औषधं देत आहात त्याने लिव्हरला इजा वगैरे तर नाही ना होणार वैद्यराज?" अजितने काळजीच्या स्वरात विचारलं. "आईंचा डायग्नोसिस काय केलंय हे ठाऊक आहे ना तुला अजित?" वैद्यराजांनी नेहमीचं स्मितहास्य करत प्रश्न विचारला. "हो. सिरॉसिस म्हणून सांगितलं आहे डॉक्टरांनी. त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. पण एकदम असं का विचारलंत?" अजित म्हणाला. "सिरॉसिस होण्याचं कारण काय सांगितलं मग तुला त्यांनी?" वैद्यराजांचा पुढचा प्रश्न आला. "असं काही स्पेसिफिक सांगता नाही येणार म्हणाले ते. अनेक कारणं असू शकतात असं म्हणत होते." "अच्छा. मला सांग. आई पेनकिलर गोळ्या खायच्या का रे?" वैद्यराजांनी आणखी एक प्रश्न पुढे विचारला. "हा. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं. पण ती अधूनमधून डोकं दुखतं म्हणून खात असायची पेनकिलर. पण त्याचं काय मध्येच?" अजित गोंधळला होता. "अरे आईंच्या केसपेपरवर DILI म्हणजेच drug induced liver injury असं स्पष्ट लिहिलंय! युरोपियन जर्नल ऑफ इंटरनल मेडिसननुसार औषधांनी होणाऱ्या यकृत इजांपैकी ३५% NSAID म्हणजे सोप्या शब्दांत पेनकिलरमुळे दुष्परिणाम म्हणून होतात, अँटीबायोटिक्स मुळे २०%, इम्युनिटी कमी करणाऱ्या औषधांमुळे ९% तर डायबेटिस वरच्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून ४% यकृत इजा दिसतात. २०% यकृत इजा या मिश्र कारणांनी होतात; असा आकडा आहे. यात पारंपरिक औषधं पण आली हा. पण यातल्या बहुतेक केसेस मध्ये पेशंटने स्वतःच्या मनाने आणि वाईट दर्जाची औषधं घेतली असल्याचं दिसून येतं. त्यातही यातला आयुर्वेदाचा आकडा डोक्यावरून पाणी १०% समज. पण आपली मानसिक गुलामगिरी बघ हं; आपण ज्यांच्यामुळे ९०% यकृत इजा होतात - त्यांना एका शब्दानेही तू विचारलेला प्रश्न विचारत नाही. आम्हा १०% वाल्यांवरच काय ते जुलूम तुमचे. आणि तेही ९०% वाले तुमच्या डोक्यात पिल्लू सोडणार म्हणून. हो ना? " वैद्यराजांनी आधी विषय स्पष्ट करून नंतर नेहमीच्या मिश्किलपणे आपला मुद्दा संपवला. "बापरे.....खरंच यातलं काही माहिती नव्हतं हो वैद्यराज. आणि तुम्ही म्हणता तेही खरंय. माझा मावसभाऊ डॉक्टर आहे. त्यानेच हा प्रश्न विचारायला सांगितला होता. तुम्ही प्लीज राग मानून घेऊ नका." अजित अगदीच नरमला होता. "अरे राग काय त्यात? सवय आहे आम्हाला याची. आणि तुला आईबद्दल काळजी असल्यानेच तू विचारलं असणार याची खात्रीही आहे." वैद्यराजांनी हसत हसत अजितला निरोप दिला. - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति

👍 🙏 ❤️ 😮 👌 80
Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
2/22/2025, 3:30:10 AM

उद्या सकाळी..... गिरगांव! प्रवेश सगळ्यांसाठी खुला आहे.

Post image
👍 🙏 ❤️ 👌 50
Image
Link copied to clipboard!