
Dr. Pareexit Shevde
January 29, 2025 at 02:56 AM
#महत्त्वाचे
"पिंडी ते ब्रम्हांडी" हे वरवरचे वाक्य नसून अत्यंत गहन अर्थ त्यात दडला आहे. चरकसंहितेतील "लोकपुरुषसाम्य सिद्धांत" असो वा "वातकलाकलीय" यांतून त्याची एक झलक मिळते. पण त्याचा मथितार्थ जाणून घेणं ही सर्वस्वी अनुभूतीचा विषय आहे.
सर्वच इंद्रियांची नैसर्गिक प्रवृत्ती बाह्यसुखाची आहे. ती अंतर्मुख करणे हा साधनेचा भाग आहे. ही अंतर्मुखता जमू लागली की "पिंडी ते ब्रम्हांडी"चे स्तर उलगडू लागतात. कल्पवासात असलेल्यांसाठी आजचं पर्व महत्त्वाचं आहे. पण आपणही जरी कुंभात गेला नसाल तरी घरच्या घरी आजच्या पर्वाचा लाभ साधनेत घेऊ शकता. ज्यांना संपूर्ण काळ मौन शक्य नाही. त्यांनी किमान जमेल तितका वेळ मौन धारण करून अधिकाधिक नामस्मरण केलं तरी आजचा दिवस काहीतरी वेगळं नक्की देऊन जाईल.
अनुभव घेऊन पहा!
मौनी अमावस्या 🌑
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏
❤️
👍
👌
🪔
68