
Dr. Pareexit Shevde
January 31, 2025 at 03:35 AM
#घरोघरी_आयुर्वेद
Hmm..... पण केव्हा?!
चॅट करताना रिप्लाय सुचला नाही की; "hmm" हा आपला त्राता असतो! पण हा Hmmmm म्हणजेच humming sound किंवा भुंग्याचा गुंजारव आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे.
Vagus nerve ही हृदय, फुफ्फुस आणि पचन यांच्या parasympathetic कार्याला नियंत्रित करते. साधारणपणे आपल्याला स्ट्रेस आला की या अवयवांची कार्य बिघडतात. ती पूर्ववत् करायला किंवा स्ट्रेस कमी करायला Vagus nerve relaxation केलं जातं. या प्रक्रियेचा एक पर्याय म्हणजे humming sound.
आपल्याकडे सांगितलेला भ्रामरी हा प्राणायाम प्रकार म्हणजे humming sound च आहे. नियमित भ्रामरी केल्याने स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते हे EEG, MRI यांसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही सिद्ध करण्यात आलं आहे. यावरची संशोधने उपलब्ध आहेत. नियमित भ्रामरी करणाऱ्या व्यक्तींमध्ये स्ट्रेस कमी होणे, त्याचे दुष्परिणाम कमी होणे यांसारखे लाभ होतात. ज्यांना भ्रामरी येत नसेल ते यूट्यूब वर पाहून शिकू शकतात. अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
स्ट्रेस व्यतिरिक्त मायग्रेन, ऑटिझम, ADHD, ग्रहणीसारखे पचनाचे विकार यांतही आयुर्वेदीय उपचारांसहच भ्रामरी केल्याने अधिक लाभ होतो असा आमचा अनुभव आहे. मुख्यत: वात आणि पित्त यांच्या तक्रारींवर भ्रामरीचा अतिशय सकारात्मक परिणाम होताना दिसतो.
देवी भागवत पुराण, देवी माहात्म्य आणि लक्ष्मी तंत्र अशा ग्रंथांत भ्रामरी देवी नामक जगदंबेचं रूप वर्णित केलं आहे. अरुण नामक दैत्याचा आदिशक्तीने या रूपात वध केला अशी कथा आहे. श्रीशैल्यम् ला भ्रमरांबा म्हणून महादेवांसह आदिशक्तीचं हे रूप विराजमान आहे. अन्यत्र भ्रामरी श्री दुर्गा परमेश्वरी म्हणून तिचं पूजन होतं. आपल्याकडच्या कथा, रुपकं गहन असतात. त्यांचा खोलात शिरून शोध घ्यावा लागतो.
भ्रामरी हा प्राणायाम म्हणून सोपा उपाय आहे. कोणतंही साधन लागत नाही. कधीही, कुठेही करता येतो. शारीरिक, मानसिक लाभ आहेतच; आध्यात्मिक लाभही आहे......बघा तर करून!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏
👍
❤️
😂
78