Dr. Pareexit Shevde
Dr. Pareexit Shevde
February 9, 2025 at 02:56 AM
#महत्त्वाचे Total Dissolved Solids म्हणजे पाण्यातले क्षार मोजण्याचं प्रमाण. TDS meter नावाच्या छोट्याश्या यंत्राने ते मोजता येतात. पिण्याच्या पाण्याबाबत बोलायचं झालं तर साधारणपणे १००-१५० TDS ही पातळी योग्य क्षार असलेली पातळी गणली जाते. (याबाबत स्वतंत्रपणे लिहीन) अंघोळीच्या पाण्यात ५००+ TDS असणं हे त्वचा, केस याकरता हानिकारक समजलं जातं. आपल्या स्विमिंग पूल मध्ये साधारणपणे १५०० च्या आसपास ही पातळी नियंत्रित ठेवली जाते. त्याच्यावर गेल्यास त्वचेच्या अडचणी दिसू शकतात. कुंभमेळ्यात ऐन मौनी अमावस्येला; जिथे काही कोटी लोकांनी स्नान केलं होतं - तिथल्या म्हणजेच संगमाच्या पाण्याचं सँपल घेऊन आम्ही TDS तपासलं. या क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना आधी मत विचारलं असता; इतके लोक स्नान करत आहेत म्हटल्यावर साधारणपणे २००० च्या आसपास - म्हणजेच त्वचा, केसांना हानिकारक असा आकडा येईल असा त्यांचा तर्क होता. प्रत्यक्षात आम्ही तपासल्यावर हा आकडा जेमतेम ३०० इतका म्हणजे स्नानासाठी अगदीच उत्तम पातळीत होता! कोट्यावधी लोकांनी स्नान केलं त्या दिवशी आणि त्या स्थानीही पाण्याची गुणवत्ता "स्नानासाठी" उत्तम होती. याचा एक अर्थ असाही की; हे पाणी वाहतं ठेवण्यात योगी सरकारने उत्तम कार्य केलंय! दोन वर्षांपूर्वी नर्मदा मय्याचं पाणी आणलं होतं. त्याचा आजच्या घडीला TDS निघाला १०० च्या आसपास. हे सगळे विस्तृत संशोधनाचे विषय आहेत. मी केवळ छोटं निरीक्षण नोंदवत आहे. मात्र; प्रत्यक्ष प्रयोग करून मगच लिहितोय. नद्या मातृस्वरूप आहेत. आपल्याला आईप्रमाणे जपतात हेच खरं! हर हर गंगे! नर्मदे हर!! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
🙏 👍 ❤️ 😮 👌 🪔 119

Comments