
Dr. Pareexit Shevde
February 12, 2025 at 11:29 AM
"जे AI app तुमचे वैद्यकीय रिपोर्ट सोप्या भाषेत समजावून सांगू शकतं. तेच app डाव्या हाताने लिहिणाऱ्या माणसाचं रेखाचित्र मात्र रेखाटू शकत नाही." मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही "ए आय गुगली" सध्या चांगलीच गाजते आहे. मात्र या वाक्याच्या पुढे त्यांनी केलेले विधान हे अधिक महत्त्वाचं आहे. ते म्हणाले; असं होण्याच्या मागचं कारण हे ट्रेनिंग डेटा मध्ये असलेला भरणा आहे. ट्रेनिंग डेटामधला भरणा हा उजव्या हाताने लिहिण्याचा असेल तर मशीन लर्निंग कडून तेच दाखवलं जाणार.
खाजगी वैद्यकीय प्रॅक्टिसमधल्या केसेस जर्नलमध्ये प्रकाशित केल्या जाव्यात असं कोणतंही बंधन नाही. तरीही वेळप्रसंगी पदरमोड आणि वेळेचा अपव्यय करून इंटरनॅशनल पियर रिव्ह्यूड जर्नलमध्ये केस रिपोर्ट्स प्रकाशित करण्याचे उद्योग आमच्या दवाखान्यात सतत सुरू असतात. याचा एकमेव हेतू हा "scientific forum वर आयुर्वेदाची उपस्थिती" हाच आहे. या खटपटीने कोणताही "व्यावसायिक लाभ" होत नसतो. पण तरीही आपला presence राहिला तरच उद्या ट्रेनिंग डेटा मध्ये कुठेतरी आयुर्वेदाचं प्रतिबिंब दिसणार आहे. अन्यथा मोठमोठ्या *र्मा कंपन्या ही उपस्थिती पुसून काढायला बसलेल्याच आहेत.
मशीन लर्निंग आणि एआय कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उलट आपला त्यात scientific presence दिसण्यासाठी अखंड प्रयत्न करावे लागतील. Data is new currency. कळ सोसून का होईना; हे करावंच लागेल.....आयुर्वेदासाठी!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
❤️
🙏
👌
👏
74