Dr. Pareexit Shevde
February 15, 2025 at 02:43 AM
"लढाईत महादजी शिंदे यांचा पाय कापला गेला. पुढे आयुर्वेदाच्या सहाय्याने त्यावर मलमपट्टी केली गेली आणि त्यांचं आरोग्य उत्तम राखलं गेलं."
- ज्योतिरादित्य शिंदे; केंद्रीय संवाद मंत्री
लक्षात घ्या; पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर उत्तर भारतात मराठा सत्तेचे पुनरुज्जीवन करण्यात महादजींची भूमिका महत्त्वाची होती.
ही लढाई झाली १७६१ साली. आणि महादजींनी देह ठेवला १७९४ मध्ये. म्हणजेच अवयव गमावल्यानंतरही आयुर्वेद उपचार घेऊन पुढची सुमारे तीस वर्षे ते केवळ स्वस्थच नव्हते तर त्यांनी उत्तमरीत्या प्रशासनदेखील चालवलं.
आयुर्वेदाचे इतिहासातले दाखले विचारणाऱ्यांनी हे प्रसंगही लक्षात घ्यावे!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
👍
🙏
❤️
👌
😮
79