
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
January 21, 2025 at 10:53 AM
वार्षिक कार्यक्रम २०२५-२६ ची आखणी’ या विषयानुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागाचे मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ओबीसी विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते. विभागाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या.
👍
2