OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 30, 2025 at 02:26 PM
                               
                            
                        
                            समाजात न्याय व समानता प्रस्थापित करण्यासाठीचे एकमेव साधन म्हणजे" शिक्षण... " शिक्षण हे सर्व समावेशक होऊन न्याय समाजाची स्थापना व्हावी, ज्यात प्रत्येक नागरिकाला स्वप्न पाहण्याची, प्रगती करण्याची आणि राष्ट्राच्या प्रगतीत हातभार करण्याची संधी मिळावी याकरिता इतर मागास बहुजन कल्याण विभाग गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या वेगवेगळ्या योजना राबवून वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे...
तोच विचार घेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे झालेल्या परेडमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने " *ज्ञानदीप* *समतेचा* "या संकल्पनेवर आधारित साकारलेला चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यामध्ये महाज्योती व अमृत यांसारख्या संस्थाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमामुळे वंचित , दुर्बल घटकांतील युवकांमध्ये कसा बदल घडवून याचे चित्रण दाखविण्यात आले. सोबतच चारी बाजूंनी लावलेल्या पेन्सिल लेखणीचं शिक्षणातील महत्त्व अधोरेखीत करत होत्या.. प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह झाल्याने वंचित घटकातील मुले उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आल्याचं रेखाटनं करण्यात आलं होतं.. 
सोबतच कलाकारांनी  ज्ञानदीप लावू समतेचा या संकल्पनेला साजेसा विचार मांडत  केलेला नृत्याविष्कार व त्यामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण शिक्षणासाठी पणाला लावला अशा सावित्रीमाईच्या कार्याचा केलेला जागर हे सगळंच विलोभनीय होत..
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                    
                                        3