Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
February 4, 2025 at 08:24 AM
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेत ५०० कोटींच्या घोटाळ्याची कबुली राज्याला दिली. यावर सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हा घोटाळा पाचशेऐवजी पाच हजार कोटींचा असल्याचा खळबळजनक खुलासा केला. ही गांभीर्यपूर्ण घटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज लोकसभेत मांडली. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनीधींनी अशा घोटाळ्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना अवगत केली का? तसेच या घोटाळ्याची चौकशी व्हावी यावर मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर या कोट्यावधींच्या घोटाळ्याची गांभीर्यपूर्ण दखल घेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या घटनेची सखोल चौकशी करुन यात गडबड असल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
👍 🙏 😂 13

Comments