
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
January 24, 2025 at 01:24 PM
*#ॲग्रीस्टॅक_कॅम्प*
*#ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी*
*#मा. प्रधान सचिव कृषी यांची ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रिएशन कॅम्पला भेट.*
दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी मा. श्री. विकास चंद्र रस्तोगी, भाप्रसे, प्रधान सचिव कृषी, महाराष्ट्र राज्य. यांनी ग्रामपंचायत पिंपळी, बारामती, जि. पुणे येथे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रिएशन CSC मोड कॅम्पला भेट दिली.
महाराष्ट्र राज्याच्या जमाबंदी आयुक्तालय आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेवर मिळवून देण्यासाठी 'ॲग्रिस्टॅक' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतांची माहिती संकलित करणे आणि त्या माहितीच्या आधारे सरकारी योजनांचे कार्यान्वयन अधिक प्रभावी व सुलभ बनवणे आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मा. श्री. विकास चंद्र रस्तोगी, भाप्रसे, प्रधान सचिव कृषी, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
#कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन
#शेतकरी
#कृषी